मला फोन नंबर, UPI आयडी, UPI नंबरचा वापर करून पैसे कसे पाठवता येतील?
तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांना PhonePe वरून पुढीलप्रमाणे पैसे पाठवू शकता:
- PhonePe अॅपच्या होम
स्क्रीन वर Transfer Money/ पैसे ट्रान्सफर करा अंतर्गत To Mobile Number /मोबाइल नंबरवर किंवा बँक/UPI आयडी वर टॅप करा.
- संपर्काचे नाव, UPI नंबर किंवा UPI आयडी शोधा किंवा निवडा.
- तुम्ही पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि Pay/पेमेंट करा किंवा Send/ पाठवा वर टॅप करा.
टीप: तुम्ही ज्या बँक खात्यातून हे पैसे पाठवत आहात ते खाते Send/ पाठवा पर्यायाच्या पुढे प्रदर्शित केले जाईल. तुम्ही ड्रॉपडाउनमधून दुसरे खाते निवडून बँक खाते बदलू शकता. - पेमेंट पूर्ण करण्यासाठी तुमचा गोपनीय UPI पिन प्रविष्ट करा.
महत्त्वाचे: जेव्हा तुम्ही UPI आयडी किंवा UPI नंबरवर पैसे पाठवाल तेव्हा ही रक्कम UPI आयडी किंवा UPI नंबरसह जोडलेल्या बँक खात्यात जमा होईल.
स्वतःला पैसे पाठवणे आणि बँक खात्याला पैसे पाठवणे याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.