माझे KYC सत्यापन अयशस्वी झाले किंवा अजूनही प्रलंबित असेल तर काय करावे?
तुमचे KYC सत्यापन खालीलपैकी कोणत्याही एका कारणांमुळे अयशस्वी किंवा अद्यापही प्रलंबित राहू शकते:
- KYC सत्यापनासाठी तुम्ही शेअर केलेले तपशील DigiLocker खात्यापासून मिळालेल्या तपशीलासोबत जुळत नाहीत.
- तुम्हाला तुमच्या DigiLocker खात्यावर प्रवेशास अनुमती दिली नाही
- तुम्ही स्पष्ट सेल्फी अपलोड केलेला नाही
- तुमची डिजिटल स्वाक्षरी स्पष्ट नाही
- तुम्ही आधार ई-साइन पडताळणी पूर्ण केलेली नाही
कृपया तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा.
जर तुम्हाला तुमचे सत्यापन अयशस्वी झाल्याचे किंवा प्रलंबित असल्याचे दिसते आहे आणि त्यासाठी वरीलपैकी कोणतेही कारण नाही, तर कृपया पुढे दिलेल्या आमच्याशी संपर्क करा बटणावर क्लिक करा आणि एक तिकीट दाखल करा. यामुळे आम्हाला तुमची अधिक चांगल्याप्रकारे मदत करता येईल.
अधिक माहितीसाठी पाहा तुम्ही PhonePe वर तुमच्या KYC सत्यापनाची स्थिती कशी तपासू शकता.