मासिक SIP काय आहे?
सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP) तुम्हाला निश्चित रकमेची मासिक गुंतवणूक करण्याची परवानगी देते आणि आपल्याला नियमित गुंतवणूक करण्याची सवय लावण्यास मदत करते
मासिक SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-
छोट्या रकमेपासून सुरूवात करा, मोठी बचत करा - गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम येईपर्यंत वाट पाहाण्याची गरज नाही आणि तुम्ही दर महिन्याला फक्त 500 रुपयांपासून सुद्धा सुरूवात करू शकता. नियमितपणे थोडी थोडी रक्कम गुंतवणूक करत जाणे दीर्घ कालावधीत संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
गुंतवणूकीसाठी शिस्तबद्ध दृष्टिकोन- तुम्ही नियमित गुंतवणूक करू इच्छिता पण नेहमी तसे करण्यास विसरता? SIP रिमाइंडर इथे तुमच्या मदतीसाठी आला आहे. हे फिचर दर महिन्याच्या एक विशिष्ट दिवशी तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी आठवण करून देईल.
गुंतवणूकीमधील लवचिकता - रिमाइंडर दिनांकांवर पुरेसे पैसे नाहीत? काळजीची गरज नाही! फक्त रिमाइंडर स्नूझ करा (नंतर वर क्लिक करा) आणि काही दिवसांनंतर तुम्हाला त्या गुंतवणूकीचा पुन्हा रिमाइंडर येईल.
बाजारपेठेतील चढउतारांपासून फायदा - मार्केट डाउन असताना तुमच्या गुंतवणूकीमध्ये अधिक मूल्य जोडून SIP तुम्हाला बाजारपेठेतील उतारचढावांपासून फायदा मिळवून देण्यात मदत करते. बाजारपेठेतील अल्पकालीन उतारचढावांचा परिणाम कमी करण्यात ते मदत करते.