मी पेमेंट रिमाइंडर सेट केलेल्या एका SIP गुंतवणुकीसाठी मला ऑटो-पे कसा सेट करता येईल?

तुम्ही पेमेंट रिमांइडर सेट केलेल्या गुंतवणुकीकरता ऑटो-पे सेट करण्यासाठी:

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या बॉटमला Wealth/संपत्ती वर टॅप करा. 
  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी My Portfolio/माझा पोर्टफोलिओ टॅप करा आणि My SIP/माझे SIP निवडा.
  3. तुम्ही पेमेंट रिमांइडर लावलेल्या SIP गुंतवणुका निवडा.
  4. Set AutoPay/ ऑटो-पे सेट करा वर टॅप करा.
  5. Continue/ पुढे सुरु ठेवा वर टॅप करा.
  6. खाते सत्यापनासाठी बँक खाते आणि पेमेंट माध्यम (नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा UPI) निवडा आणि Proceed to Verify/ सत्यापनासाठी पुढे जा वर टॅप करा. 
  7. तुम्हाला तुमच्या बँक वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. तुम्ही निवडलेल्या पेमेंट साधनाच्या आधारे, तुम्हाला तुमचे खाते सत्यापित करण्यासाठी आणि ऑटो-पे सेट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक तपशील प्रदान करण्याची आवश्यकता असेल. 

महत्त्वाचे: तुमचे पहिले ऑटो पेमेंट पूर्ण झाल्यावर, म्युच्युअल फंड प्रदात्याने तुमचे युनिट तुम्हाला प्रदान केल्यावर आम्ही तुम्हाला सूचित करू. तुम्हाला सूचित केल्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या PhonePe ॲपवर संबंधित म्युच्युअल फंड गुंतवणूक तपासू शकता.