टॅक्स सेव्हिंग फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत?
तुम्ही आयकरात बचत करण्यासाठी अजून गुंतवणूक केली नसेल, तर तुम्ही टॅक्स सेव्हिंग फंड्स सोबत सुरूवात करण्याची आम्ही शिफारस करतो. आम्ही अशी शिफारस का करतो याबाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.
- ₹46,800 पर्यंत बचत - तुमच्या आयकर स्लॅबच्या अनुसार, तुम्ही आयकरात ₹46,800 पर्यंत बचत करू शकता.
- संपत्ती निर्माण - तुम्ही टॅक्स सेव्हिंग फंड मध्ये गुंतवणूक करता, तेव्हा बँक FD, NSC, आणि PPF सारख्या इतर टॅक्स सेव्हिंग पर्यायांच्या तुलनेत दीर्घ कालावधीत जास्त रिटर्न कमवता.
- सर्वात कमी लॉक-इन कालावधी -
टॅक्स सेव्हिंग फंड्स - 3 वर्षे
बँक FD - 5 वर्षे
NSC - 5 ते 10 वर्षे
PPF - 15 वर्षे
टीप: लॉक-इन कालावधी म्हणजे या कालावधी दरम्यान गुंतवणूक केलेले युनिट्स तुम्ही विकू शकत नाही. - व्यावसायिकपणे व्यवस्थापित फंड - फंड व्यवस्थापक तुमचा पैसा गुंतवण्यासाठी संशोधन करतात आणि कंपन्यांची काळजीपूर्वक निवड करतात आणि तसेच सातत्याने तुमच्या गुंतवणूकींवर लक्ष ठेवतात.
- विविधतापूर्ण गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ - तुम्ही फक्त ₹1,000 ची गुंतवणूक केली तरी, वेगवेगळ्या बिझनेस सेक्टरमध्ये तब्बल 40 टॉपच्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता. म्हणून, स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे कार्यप्रदर्शन चांगले नसले, तरी तुम्ही तोट्याच्या उच्च जोखीम पासून सुरक्षित राहू शकता.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुम्ही PhonePe वर कोणकोणत्या टॅक्स सेव्हिंग फंड प्लॅन्स मध्ये गुंतवणूक करू शकता