मी टॅक्स सेव्हिंग फंड्स मध्ये गुंतवणूक केल्यास कलम 80C अंतर्गत मला कोणत्या करलाभांसाठी दावा करता येईल?

कलम 80C अंतर्गत तुम्हाला तुमच्या करपात्र उत्पन्नात कमाल ₹1,50,000 पर्यंत कपात करता येते. तथापि, एकूण कर बचत तुमच्या आयकर स्लॅबवर अवलंबून असते. तुमच्या कर स्लॅब अनुसार तुम्ही किती बचत करू शकता हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पाहा: 

  उदाहरण 1 उदाहरण 2
उत्पन्न ₹12,00,000 ₹8,50,000
कर स्लॅब 30% 20%
80C अंतर्गत कपातीचा दावा ₹1,50,000 ₹1,50,000
प्रत्येक स्लॅब अनुसार आयकर ₹45,000 (1,50,000 x 30% कराचा दर) ₹30,000(1,50,000 x 20% कराचा दर)
आयकरावरील सेस (4%) ₹1,800 (45,000 x 4% सेस ) ₹1,200 (30,000 x 4% सेस )
आयकरात एकूण बचत ₹46,800 ₹31,200

टीप: सरकार आर्थिक वर्ष 2019-20 आणि आर्थिक वर्ष 2020-21 साठी 4% सेस लागू करेल.

अधिक माहितीसाठी पाहा -  टॅक्स सेव्हिंग फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे.