तुम्हाला PhonePe चा रजिस्टर्ड मोबाइल नंबर बदलायचा असेल, तर तुम्हाला तुमचे विद्यमान PhonePe खाते निष्क्रिय करावे लागेल आणि नवीन नंबरसोबत एक नवीन खाते तयार करावे लागेल. तुम्ही आमच्याकडे खाते निष्क्रिय करण्याची विनंती दाखल करून तुमचे खाते डिलीट करू शकता.
खाते निष्क्रिय करण्याची विनंती करण्यापूर्वी, कृपया खालील गोष्टींची खात्री करा:
- सर्व प्रलंबित रिफंड प्राप्त झाले आहेत.
- कॅन्सल केलेल्या ऑर्डर किंवा बुकिंग संबंधित सर्व समस्यांसाठी तुम्हाला मदत मिळाली आहे आणि सर्व समस्यांचा निपटारा झाला आहे.
- तुम्हाला मिळालेल्या सर्व बक्षीसाचे कूपन वापरले आहेत.
टीप: तुम्ही तुमचे खाते निष्क्रिय करता तेव्हा तुम्ही न वापरलेली बक्षीसे कालबाह्य होतील. - तुमचा वॉलेट बॅलेन्स पेमेंटसाठी वापरला आहे, किंवा लागू असल्यास, तुमचा बॅलेन्स काढला आहे.
टीप: तुम्ही किमान-KYC केलेले युजर असल्यास आणि तुम्ही तुमचा काढता येणारा वॉलेट बॅलेन्स, तुमच्या बँक खात्यात घेऊ इच्छित असल्यास, तुम्हाला तुमचे PhonePe वॉलेट निष्क्रिय करणे जरूरी आहे. तुमचे वॉलेट निष्क्रिय करण्यासाठी, तुमच्या वॉलेटमध्ये किमान ₹1 बॅलेन्स असणे गरजेचे आहे. - तुमची सर्व बँक खाती अनलिंक करा.
टीप: तुम्ही बँक खाते अनलिंक करण्याआधी तुमचा काढता येणारा वॉलेट बॅलेन्स, लागू असल्यास तुमच्या बँक खात्यात काढला आहे याची खात्री करा. - तुमचे सर्व सेव्ह केलेले कार्डचे तपशील डिलीट केले आहेत.
- तुम्ही PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्याची विक्री केली आहे किंवा त्याचे वितरण करून घेतले आहे.
खाते निष्क्रिय करण्याची विनंती करण्यासाठी, कृपया खालील बटणावर टॅप करा.