मला माझ्या PhonePe खात्याचा वापर तात्पुरत्या स्वरूपात बंद करायचे आहे

तुम्ही लॉगआउट करून तुमचे PhonePe खाते तात्पुरत्या स्वरूपात  निष्क्रिय करू शकता.

सध्या, तुम्हाला तुमचे PhonePe खाते तात्पुरत्या स्वरूपात निष्क्रिय करण्याचा पर्याय उपलब्द नाही. तुम्ही PhonePe वापरणे काही काळासाठी बंद करू इच्छित असल्यास, तुम्ही तुमच्या ॲपवरून लॉगआउट होऊ शकता. 

तुमच्या खात्यातून लॉगाउट होण्यापूर्वी तुम्ही तुमचा वॉलेट बॅलेन्स, PhonePe गिफ्ट कार्ड, आणि गोल्ड बॅलेन्स, काही असेल तर तो वापरू शकता. तथापि, तुमचा हा बॅलेन्स प्रभावित होणार नाही आणि तुम्ही जेव्हा पुन्हा लॉगिन कराल तो तुमच्या खात्यात राहील.

तुमच्या PhonePe खात्यातून लॉगआउट होण्यासाठी:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा. 
  2. स्क्रीनच्या बॉटमपर्यंत खाली स्क्रोल करा आणि Logout/लॉगआउट वर टॅप करा.
  3. पुष्टी करण्यासाठी Yes/होय वर टॅप करा. 

तुम्हाला पेमेंट करण्यासाठी PhonePe वापरायचे असल्यास तुम्ही तुमच्या खात्यात कधीही पुन्हा लॉगिन करू शकता.

टीप: तुम्ही लॉगआउट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या PhonePe वर रजिस्टर्ड नंबर आणि UPI आयडीवर पैसे मिळत राहतील. तसेच तुम्ही सेट केलेल्या रिमाइंडरबाबत तुम्हाला सूचना सुद्धा मिळत राहतील.