मी माझा PhonePe पासवर्ड विसरल्यास काय करावे?

तुम्ही खालील पायऱ्यांचे अनुसरण करून ॲप लॉगिन स्क्रीनवरून तुमचा पासवर्ड रीसेट करू शकता:

  1. Forgot Password/पासवर्ड विसरलात वर टॅप करा.
  2. तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
  3. आम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर पाठवलेला 5-अंकी रिसेट कोड/OTP प्रविष्ट करा. तुम्ही SMS परवानग्या सक्षम केल्या असल्यास, OTP आपोआप टाकला जाईल.
  4. तुमचा नवीन 4-अंकी ॲप पासवर्ड सेट करा.

वैकल्पिकरित्या, तुम्ही लॉगिन केले असल्यास,

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  2. Security/सुरक्षा विभाग अंतर्गत Change Password/पासवर्ड बदला वर टॅप करा.           
  3. तुमचा विद्यमान पासवर्ड प्रविष्ट करा.
    टीप: जर तुम्ही तुमचा विद्यमान पासवर्ड विसरला असल्यास, Forgot password?/पासवर्ड विसरलात? वर टॅप करा.
  4. तुमचा नवीन पासवर्ड प्रविष्ट करा.
  5. Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.