मी PhonePe वर कोणत्या प्रकारची बक्षिसे प्राप्त करू शकेन?
तुम्ही PhonePe वर पुढील प्रकारची बक्षिसे प्रप्त करू शकता:
- कॅशबॅक बक्षिसे- तुम्ही PhonePe द्वारे केलेल्या कोणत्याही पेमेंटसाठी थेट कॅशबॅक किंवा ऑफरच्या नियम व अटीनुसार स्क्रॅच कार्डच्या माध्यमातून कॅशबॅक प्राप्त करू शकता. ही रक्कम तुमच्या काढता न येणाऱ्या (गिफ्ट व्हाउचर) PhonePe वॉलेट बॅलेन्स मध्ये जोडली जाईल. तुम्ही या कॅशबॅक रकमेचा वापर PhonePe वापरून केलेल्या कोणत्याही पेमेंटसाठी करू शकता. तथापि, या रकमेस तुमच्या PhonePe वर लिंक बँक खात्यात काढू शकत नाही किंवा दुसऱ्या PhonePe युजरला ट्रान्सफर करू शकत नाही.
अधिक माहितीसाठी पाहा - तुमच्या कॅशबॅक रकमेचा वापर करून तुम्ही कोणते पेमेंट्स करू शकता.
टीप: तुम्ही 31 मार्च रोजी संपणाऱ्या एका आर्थिक वर्षात कमाल ₹9,999 पर्यंत कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता.
- ऑफर बक्षिसे - तुम्ही ऑफरच्या नियम व अटीची पूर्तता करत असल्यास तुम्हाला PhonePe वापरून केलेल्या कोणत्याही पेमेंटसाठी ऑफर प्राप्त होऊ शकतात. तुमच्या PhonePe ॲपवरील बक्षिसे विभागात तुम्हाला प्राप्त झालेल्या कोणत्याही ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Avail Offer/ऑफरचा लाभ घ्या वर टॅप करावे लागेल आणि जर तुम्ही कोणत्याही पेमेंवर ऑफरसाठी पात्र असाल तर आम्ही त्यास आपोआप लागू करू.
- कूपन बक्षिसे- तुम्ही कोणत्याही PhonePe स्विच ॲप्स किंवा व्यापारी वेबसाइट/ॲपवर पेमेंट करताना तुम्हाला प्राप्त झालेल्या कूपन कोडला वापरू शकता. अधिक माहितसाठी पाहा - तुम्हाला प्राप्त झालेला कूपन कोड यशस्वीपणे वापरणे.