कूपन बक्षीस काय आहे? मला कूपन बक्षीसाचा लाभ कसा घेता येईल?

कूपन बक्षीस हे तुम्ही PhonePe वर केलेल्या पेमेंटसाठी तुम्हाला दिला जाणारा बक्षीसाचा एक प्रकार आहे. ही कूपन बक्षिसे विविध प्रकारच्या मर्चंटकडून जारी केली जातात ज्यांचा वापर संबंधित मर्चंट ॲप किंवा वेबसाइटवर विनिर्दिष्ट नियम व अटींनुसार केला जाऊ शकतो.  

तुम्हाला प्राप्त झालेल्या कूपन बक्षीसाचा लाभ घेण्यासाठी,

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील  Rewards/ बक्षिसे वर टॅप करा.
  2. कूपन बक्षीस निवडा आणि कूपन कोड पाहण्यासाठी Show/ दाखवा वर टॅप करा. 
    टीप: एकदा तुम्ही Show/ दाखवा वर टॅप केल्यावर तुम्ही बक्षीस बदलू किंवा गिफ्ट करू शकणार नाहीत.
  3. Copy/कॉपी वर टॅप करा.
    टीप: कूपन वापरण्यासाठी तुम्ही ऑफरच्या तपशीलवार नियम व अटी पाहाण्यासाठी Offer Details/ऑफरचे तपशील वर टॅप करा. 
  4. Order Now/Avail Now/Buy Now/Show Now/लगेच ऑर्डर करा/लगेच वापर करा/लगेच खरेदी करा/लगेच दाखवा वर टॅप करा आणि तुम्हाला आपोआप संबंधित मर्चंट वेबसाइट किंवा ॲपवर पुनःनिर्देशित केले जाईल.
  5. पात्र वस्तू निवडा आणि पेमेंट करण्याआधी कूपन कोड लागू करा.

अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही कूपन बक्षीसाचा लाभ कधी घेऊ शकणार नाहीत.