मला PhonePe वर प्राप्त झालेले बक्षीस गिफ्ट म्हणून कसे पाठवता येईल?
टीप: तुम्ही फक्त ऑफर आणि कूपन यांना गिफ्ट म्हणून पाठवू शकता. तुम्ही कॅशबॅक बक्षिसे पाठवू शकणार नाही.
तुम्हाला मिळालेले बक्षीस त्याचा वैधता कालावधी समाप्त होण्यापूर्वी तुम्ही कधीही पाठवू शकता.
बक्षीस गिफ्ट म्हणून पाठवण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Rewards/बक्षिसे विभागावर टॅप करा.
- तुम्हाला जे बक्षीस पाठवायचे आहे ते निवडा.
- Gift Now/गिफ्ट करा वर क्लिक करा.
- तुम्हाला हे बक्षीस ज्यांना गिफ्ट म्हणून पाठवायचे आहे त्या संपर्काचा शोध घ्या आणि तो निवडा.
- तुम्ही पॉप-अप वर Send As Gift/गिफ्ट म्हणून पाठवा मध्ये, तुम्हाला हवा असल्यास वैयक्तिक संदेशसुद्धा जोडू शकता.
- बक्षीसासाठी निवडलेल्या संपर्कास गिफ्ट करण्यासाठी Send/पाठवा वर क्लिक करा. गिफ्ट करणे कॅन्सल करण्यासाठी Discard/काढून टाका वर क्लिक करा.
अधिक माहिती येथे पाहा - तुम्हाला मिळालेली बक्षिसे तुम्ही कोणाला गिफ्ट करु शकता.