मी PhonePe चा वापर करून इतर वेबसाइट आणि ॲप वरील माझ्या ऑर्डरसाठीचे पेमेंट कसे करावे?
तुम्ही इतर वेबसाइट किंवा ॲपवर केलेल्या तुमच्या ऑर्डर किंवा खरेदीचे पेमेंट PhonePe द्वारे पुढीलप्रमाणे करू शकता:
- वेबसाइट किंवा ॲपचे पेमेंट पृष्ठ किंवा स्क्रीन वरील PhonePe UPI किंवा UPI वर क्लिक करा.
- आवश्यक असल्यास, तुमचा UPI आयडी (VPA) टाका.
- तुम्हाला SMS च्या माध्यमातून आणि तुमच्या PhonePe ॲप मध्ये अधिसूचनेच्या माध्यमातून एक पेमेंट विनंती प्राप्त होईल. तुम्ही खालीलपैकी कोणत्या एकाची निवड करू शकता:
-SMS द्वारे प्राप्त झालेल्या लिंक वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या PhonePe ॲपच्या पेमेंट स्क्रीन वर नेले जाईल.
-तुमची PhonePe ॲप निवडा. तुम्हाला बिलिंग रकमेसोबत एक पॉप-अप दिसेल आणि पेमेंट करा किंवा नकार द्या चा पर्याय दिसेल. तुमचे पेमेंट करण्यासाठी पेमेंट करा वर क्लिक करा. - प्राधान्याचे पेमेंट माध्यम निवडा. उपलब्ध पेमेंट पर्याय आहेत:
- UPI
-डेबिट कार्ड
-क्रेडिट कार्ड - तुम्ही निवडलेल्या पेमेंट माध्यमानुसार, UPI पिन/कार्ड तपशील टाका.
- Submit/सादर करा वर क्लिक करा.
एकदा पेमेंट यशस्वी झाल्यावर, तुम्हाला वेबसाइट किंवा ॲपवर पुष्टीकरणाचे पृष्ट दिसेल.
महत्त्वाचे: कृपया कोणतेही पेमेंट अधिकृत करण्याआधी खात्री करा की तुम्ही रक्कम आणि पेमेंटची विनंती करणाऱ्यास सत्यापित केले आहे. तुम्ही पेमेंट विनंती मंजूर करू इच्छित नसल्यास किंवा तुम्हाला त्याबाबत माहिती नसल्यास, Decline/नकार द्या वर क्लिक करा.