मला पेमेंट विनंती अधिसूचना किंवा SMS प्राप्त न झाल्यास काय?
तुम्हाला तुमच्या PhonePe ॲप वर पेमेंट विनंती अधिसूचना प्राप्त झाली नसेल, तर कृपया पुढील चरणांचे अनुसरण करा:
1. PhonePe ॲप उघडा आणि होम स्क्रीनच्या शीर्षभागी उजव्या कोपऱ्यावरील अधिसूचना (घंटी आयकॉन) वर क्लिक करा.
2. स्क्रीन खाली ओढून अधिसूचना स्क्रीन रिफ्रेश करा.
3. जर तुम्हाला अजूनही अधिसूचना दिसत नसेल, तर तुमची PhonePe ॲप बंद केल्यानंतर आणि पुन्हा उघडल्यावर परत प्रयत्न करा.
टीप: तुमची इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असल्याची खात्री करा.
तुम्हाला SMS च्या माध्यमातून पेमेंट विनंती अधिसूचना प्राप्त झाली नसेल, तर कृपया खालील गोष्टींची खात्री करा:
- तुमची मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली आहे.
- तुम्ही आमच्यासोबत रजिस्टर्ड मोबाइल नंबसाठी तुमच्या ऑपरेटर सोबत DND (डू नॉट डिस्टर्ब) सक्रिय केलेले नाही. तुम्ही याची तपासणी तुमच्या Settings > Apps & notifications > Notifications > Do Not Disturb मध्ये जाऊन करू शकता.
जर तुम्हाला वरील तपासणी केल्यानंतर सुद्धा पेमेंट विनंती अधिसूचना प्राप्त झाली नसेल, तर दुसरे पेमेंट माध्यम वापरून पेमेंट करा.