PhonePe स्विच काय आहे?

PhonePe ॲपवरील PhonePe स्विच हा विभाग तुमच्या सर्व आवडत्या ॲप एकाच जागी घेऊन आला आहे. तुम्ही स्विच वर या विविध ॲपवर उपलब्ध सर्व सेवांचा लाभ सुलभतेने घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला वेगळ्याने तुमच्या फोनमध्ये या ॲप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याची गरज राहत नाही. PhonePe स्विच वरून या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त सुविधा शुल्क आकारले जात नाही आणि PhonePe द्वारे कोणत्याही अडथळ्याशिवाय पेमेंटचा अनुभव घेऊ शकता.    

याशिवाय, तुम्ही पुढील लाभ सुद्धा मिळवू शकता: 

महत्तवपूर्ण: PhonePe स्विच विभागातील सर्व वेगवेगळ्या ॲप या त्यांच्या संबंधित मर्चंटद्वारे व्यवस्थापित केल्या जातात. PhonePe वर कोणत्याही मर्चंट ॲपवरील कोणत्याही सेवा पूर्णपणे त्या मर्चंटद्वारे पूर्ण केल्या जातात. PhonePe द्वारे केवळ PhonePe स्विच वरील ॲप्सच्या कोणत्याही पेमेंट संबंधित समस्यांचे निवारण केले जाईल.  

PhonePe स्विच वापरण्याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पाहा मी PhonePe स्विच चा वापर कसा करावा?