मला माझ्या बिल पेमेंटसाठी इनव्हॉइस कसा मिळेल?
तुमच्या बिल पेमेंटसाठी इनव्हॉइस मिळवण्यासाठी, तुम्हाला सेवा प्रदाता, बिलर किंवा ऑपरेटरच्या वेबसाइटवर लॉगिन करणे आवश्यक आहे, किंवा तुम्ही सेवा प्रदात्याच्या ग्राहक सहाय्यता टीम सोबत संपर्क करू शकता आणि तुमचा व्यवहार रेफरंस आयडी शेअर करू शकता.
तुम्ही PhonePe वर केलेल्या सर्व पेमेंटसाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावर (सत्यापित असल्यास) लगेचच आम्ही पावती पाठवतो. तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता सत्यापित केलेला नसल्यास,पुढील चरणांचे अनुसरण करा:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
- ई-मेल सत्यापित करा वर क्लिक करा.
- आमच्यासोबत रजिस्टर्ड ई-मेल पत्त्यावर पाठवलेला सत्यापन कोड टाका, पॉप-अप मध्ये पुष्टी करा वर क्लिक करा.