PhonePe वरील देणगी फीचर काय आहे?
PhonePe वरील देणगी पर्यायाचा वापर करून तुम्ही ॲपवर सूचीबद्ध असलेल्या कारणांसाठी, NGO आणि धार्मिक संस्थांना सुरक्षितपणे देणगी देऊ शकता. तुम्ही देणगी देण्यासाठी UPI, डेबिट कार्ड, किंवा तुमच्या PhonePe वॉलेटचा वापर करू शकता.
कारणांसाठी, NGO ला दिलेल्या प्रत्येक देणगीसाठी, तुम्हाला आमचे पार्टनर GiveIndia द्वारे जारी केले जाणारे 80G सर्टिफिकेट मिळेल. या सर्टिफिकेट सोबत, तुम्ही दिलेल्या देणगीच्या 50% रकमेवर आयकरात सवलतीचा दावा करू शकता. तथापि, तुम्ही धार्मिक संस्थांना दिलेल्या देणगीसाठी तुम्हाला 80G सर्टिफिकेट मिळणार नाही.
तुम्ही ॲपवर सूचीबद्ध असलेल्या कोणत्याही कारणासाठी, NGO किंवा धार्मिक संस्थांना प्रति व्यवहार कमाल ₹50,000 पर्यंतची देणगी देऊ शकता.
टीप: एका वर्षात एक किंवा अनेक देणग्याच्या माध्यमातून तुम्ही ₹50,000 पेक्षा जास्त देणगी देत असाल, तर तुम्हाला तुमच्या PAN कार्ड चे तपशील आमच्या पार्टनर GiveIndia ला, तुम्ही देणगी देत असलेल्या NGO किंवा धार्मिक संस्थेला सबमिट करावे लागतील. ते तपशील गोळा करण्यासाठी तुम्ही दिलेल्या ई-मेल आयडीवर तुमच्याशी संपर्क करतील.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe च्या माध्यमातून देणगी देणे.