मला माझ्या लोनच्या रिपेमेंटचा इनव्हॉइस कसा मिळेल?
तुम्हाला PhonePe वर केलेल्या सर्व लोन रिपेमेंटसाठी तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल पत्त्यावर(सत्यापित असल्यास) पेमेंट पावती प्राप्त होईल. तुम्ही तुमचा ई-मेल आयडी सत्यापित केला नसेल, तर तुम्ही तो पुढीलप्रमाणे करू शकता:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- Verify Email /ई-मेल सत्यापित करा वर टॅप करा.
- तुम्ही आमच्याकडे रजिस्टर केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवलेला सत्यापन कोड प्रविष्ट करा, आणि पॉप-अप मधील Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.