मी खरेदी केलेले PhonePe गिफ्ट कार्ड माझ्या PhonePe खात्यासोबत कसे लिंक करावे?
महत्त्वाचे: तुम्ही गिफ्ट कार्ड तुमच्या खात्यासोबत लिंक केल्यानंतर ते अनलिंक किंवा शेअर करू शकत नाही.
तुम्ही खरेदी केलेले PhonePe गिफ्ट कार्ड तुमच्या PhonePe खात्यासोबत पुढीलप्रमाणे लिंक करू शकता:
1. ॲपच्या होम स्क्रीनवर My Money/माझे पैसे वर क्लिक करा.
2. PhonePe गिफ्ट कार्ड वर क्लिक करा.
3. लगेच दावा करा वर क्लिक करा.
4. पॉप-अप स्क्रीनवर गिफ्ट कार्ड नंबर आणि पिन टाका.
5. जोडा वर क्लिक करा.
किंवा
1. ॲपच्या होम स्क्रीनवरील History /व्यवहार इतिहास वर क्लिक करा.
2. गिफ्ट कार्ड खरेदी व्यवहाराची निवड करा.
3. गिफ्ट कार्डचा दावा करा वर क्लिक करा.
तुमचे गिफ्ट कार्ड ताबडतोब तुमच्या PhonePe खात्यासोबत लिंक केले जाईल.
टीप: एकदा तुम्ही तुमचे PhonePe गिफ्ट कार्ड तुमच्या PhonePe खात्यासोबत लिंक केले, की गिफ्ट कार्डची रक्कम तुमच्या गिफ्ट कार्ड बॅलेन्स सोबत जोडली जाईल आणि हे गिफ्ट कार्ड वेगळे कार्ड म्हणून दिसणार नाही. तुम्ही खरेदी केलेल्या गिफ्ट कार्डचा वापर PhonePe वरील व्यवहारांसाठी करण्याची तुमची इच्छा नसेल, तर हे कार्ड लिंक न करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. तसेच तुम्ही व्यवहारासाठी तुमच्या PhonePe गिफ्ट कार्डची निवड पेमेंटचे माध्यम म्हणून केल्यास, PhonePe व्यवहाराच्या कमाल आवश्यकतेपर्यंत एकूण उपलब्ध गिफ्ट कार्ड बॅलेन्सचा वापर करेल. तुम्ही उपलब्ध गिफ्ट कार्ड बॅलेन्स पासून विशिष्ट रकमेची निवड करू शकणार नाहीत.
अधिक माहितीसाठी पाहा आणि .