PhonePe गिफ्ट कार्ड काय आहे?
PhonePe गिफ्ट कार्ड एक प्रिपेड पेमेंट पर्याय आहे जो रोख रकमेच्या समान आहे. हे कार्ड भेट म्हणूनही दिले जाऊ शकते किंवा PhonePe वर पेमेंट करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.
PhonePe गिफ्ट कार्ड इतर उपलब्ध ई-गिफ्ट कार्डपेक्षा पुढील प्रकारे वेगळे आहे:
- हे कार्ड तुम्हाला तुमच्या PhonePe खात्यासोबत लिंक करता येते आणि या गिफ्ट कार्डमधील बॅलेन्सचा वापर पेमेंट पद्धती म्हणून कोणत्याही मर्चंट व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.
- PhonePe ॲपवर कोणत्याही मर्चंट व्यवहारांसाठी या गिफ्ट कार्डला तुमच्याद्वारे आणि तुम्ही ज्यांना ते भेट म्हणून पाठवले आहे त्यांच्याद्वारे वापरता येते. तथापि मर्चंट-विशिष्ट ई-गिफ्ट कार्ड फक्त संबंधित मर्चंट ॲपवर व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकतात.
पुढील लिंकवर अधिक माहिती पाहा - PhonePe गिफ्ट कार्ड खरेदी करणे.