मी PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्यावर मी कोणता नफा कमावला आहे का हे मला कसे कळेल?
जर तुम्ही लॉकरमध्ये संग्रहित केलेल्या सोन्याचे मूल्य वर्तमान सोन्याच्या खरेदी किंमतीपेक्षा वाढते, तर प्राप्त केलेले मूल्य आणि टक्केवारी (%) पोर्टफोलिओ मूल्याच्या खाली हिरव्या रंगात दाखवली जाईल.
सोन्याची खरेदी किंमत तुम्ही PhonePe वर खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा कमी झाली, तर फरक लाल रंगात ठळक करून दाखवला जाईल.
उदाहरणार्थ,
जर तुम्ही 1.5295 ग्रॅम सोने ₹4,895.88 प्रति ग्रॅम दराने (खरेदीच्यावेळी सोन्याची खरेदी किंमत GST वगळून) खरेदी केले, तर तुमचे गुंतवणूक मूल्य ₹7,488.25 (1.5295 ग्रॅम x ₹4,895.88 प्रति ग्रॅम) आहे.
जर आजची सोन्याची लाइव किंमत ₹4,918.78 प्रति ग्रॅम आहे, तर तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य ₹7,523.27 (₹4,918.78 प्रति ग्रॅम x 1.5295 ग्रॅम) होईल आणि तुमचा नफा ₹35 (पो्र्टफोलिओ मूल्य - गुंतवणूक मूल्य = ₹7,523.27 - ₹7,488.25) होईल आणि नफ्याची टक्केवारी ( %) होईल 0.15% (नफा/गुंतवलेले मूल्य x 100).
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तुमचा गोल्ड बॅलेन्स/पोर्टफोलिओ मूल्य तपासणे.