मी लॉकरमध्ये संग्रहित केलेल्या सोन्याच्या मूल्याची गणना कशी केली जाते?
तुम्ही लॉकरमध्ये संग्रहित केलेल्या सोन्याच्या मूल्याची गणना लाइव सोन्याच्या किंमतीचा (GST सोडून) वापर करून केली जाते.
उदाहरणार्थ, खाली दिलेल्या छायाचित्रानुसार, तुमच्या Safegold गोल्ड लॉकर बॅलेन्स 1.5295 ग्रॅम आहे आणि लाइव सोन्याची किंमत ₹4,918.78 प्रति ग्रॅम आहे, तर तुमच्या सोन्याचे मूल्य ₹7,523.27 (₹4,918.78 प्रति ग्रॅम x 1.5295 ग्रॅम) होईल. हे सोन्याचे मूल्य तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्य सुद्धा असेल.
महत्त्वाचे: तुमचे सोने विकल्यावर तुम्ही कमवलेली रक्कम लाइव विक्री किंमतीवर अवलंबून असेल आणि तुम्हाला दिसत असलेल्या पोर्टफोलिओ मूल्यापेक्षा वेगळी असू शकते.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्ही PhonePe वर खरेदी केलेल्या सोन्यावर तुम्ही काही नफा मिळवला आहे का हे तपासणे.