सोने संचयित करण्यासाठी माझ्याकडून MMTC-PAMP, Safegold किंवा Caratlane द्वारे शुल्क आकारले जाईल का?

MMTC तुम्ही PhonePe वर पहिल्यांदा सोनं खरेदी केल्याच्या तारखेपासून 5 वर्षांपर्यंत तुमचे सोनं कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बँकेच्या दर्जाच्या डिजिटल लॉकरमध्ये संचयित करेल. तथापि, 5 वर्षांनंतर तुमच्याकडून संचयनासाठी आणि कस्टडीसाठी शुल्क आकारले जाईल. तुम्हाला हे शुल्क भरायचे नसेल, तर तुम्ही सोन्याची विक्री करणे किंवा तुम्हाला त्याचे वितरण करणे यापैकी एक निवडू शकता.

Safegold तुम्ही PhonePe वर पहिल्यांदा सोनं खरेदी केल्याच्या तारखेपासून 5 वर्षांपर्यंत तुमचे सोनं कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बँकेच्या दर्जाच्या डिजिटल लॉकरमध्ये संचयित करेल. प्रत्येक ग्राहकास दिलेला कमाल संग्रहण कालावधी खरेदी केल्याच्या वेळेपासून 10 वर्ष आहे. तथापि, 5 वर्षांनंतर तुमच्याकडून संचयनासाठी आणि कस्टडीसाठी शुल्क (Safegold द्वारे 0.3% प्रति वर्ष) आकारले जाईल. तुम्हाला हे शुल्क भरायचे नसेल, तर तुम्ही सोन्याची विक्री करणे किंवा तुम्हाला त्याचे वितरण करणे यापैकी एक निवडू शकता. 

Caratlane तुमचे सोने 10 वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही शुल्काशिवाय सुरक्षित तिजोरीत साठवेल. या कालावधीनंतर तुम्हाला तुमचे डिजिटल सोने रिडीम करावे लागेल किंवा विकावे लागेल.

अधिक माहितीसाठी पाहा -  PhonePe वर तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याचा कमाल धारण कालावधी.