मला माझ्या सोन्याचे नाणे किंवा बारच्या डिलिव्हरीच्या स्थितीचा माग कसा घेता येईल?
तुम्ही तुमचे सोन्याचे नाणे किंवा बारच्या डिलिव्हरीच्या स्थितीचा माग तुम्ही Air Waybill (AWB) नंबरचा वापर करून घेऊ शकता, तसेच डिलिव्हरीच्या स्थितीचा माग घेण्यासाठीची लिंक तुम्हाला SMS आणि ईमेल द्वारे पाठवली जाईल. तुम्ही डिलिव्हरी विनंती दाखल केल्याच्या 2 दिवसांत तुम्हाला हा SMS प्राप्त होईल.
पर्यायाने, तुम्ही तुमच्या PhonePe ॲपवर तुमच्या सोन्याच्या डिलिव्हरीचा माग पुढीलप्रमाणे घेऊ शकता:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील History/व्यवहार इतिहास वर टॅप करा
- संबंधित पेमेंट निवडा
- तुमच्या ऑर्डरच्या वितरणाची स्थिती मिळवण्यासाठी Track Order/ऑर्डरचा माग घ्या वर टॅप करा.
टीप: वितरण करण्याचा केवळ दोनदा प्रयत्न केला जाईल. तुम्ही दोन्ही दिवस उपलब्ध नसल्यास, सोने प्रदाता वितरण कॅन्सल करेल आणि घडणावळ आणि डिलिव्हरी शुल्काची कपात केल्यानंतर सोने बॅलेन्स तुमच्या सोन्याच्या लॉकरमध्ये ट्रान्सफर करेल.
अधिक माहितीसाठी पाहा - तुम्हाला डिलिव्हरी मिळवण्यात काही अडचण येत असल्यास तुम्ही काय करू शकता.