डिजिटल लॉकरमध्ये संचयित केलेल्या सोन्याची डिलिव्हरी करून घेण्यासाठी मी विनंती कशी करावी?
सोने प्रदात्याने तुमच्यासाठी डिजिटल लॉकरमध्ये संचयित केलेले सोने प्राप्त करण्यासाठी:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Recharge & Pay Bills/रिचार्ज व बिल पेमेंट अंतर्गत See All/सर्व पाहा वर टॅप करा.
- Purchases/खरेदी करा विभागाअंतर्गत Gold/सोने वर टॅप करा.
- Investment Ideas/गुंतवणूक कल्पना विभाग अंतर्गत Gold & Silver/सोने आणि चांदी टॅप करा.
- Get Delivery/डिलिव्हरी मिळवा ची निवड करा आणि सोन्याचा प्रदाता निवडा (आवश्यक असल्यास).
- उपलब्ध पर्यायांमधून सोन्याचे नाणे किंवा बारची निवड करा किंवा अधिक पर्यायांसाठी Explore more gold coins/अजून सोन्याची नाणी पाहा वर टॅप करा.
- वितरणाचा पत्ता निवडा, किंवा एक नवीन पत्ता जोडण्यासाठी Add Address/पत्ता जोडा वर टॅप करा आणि Confirm Address/पत्त्याची पुष्टी करा वर टॅप करा.
- तुम्ही बरोबर पत्ता निवडला असेल तर पॉप-अप मध्ये Confirm/पुष्टी करा वर टॅप करा किंवा दुसरा पत्ता निवडायचा किंवा जोडायचा असल्यास Cancel/कॅन्सल करा वर टॅप करा.
- Proceed to Pay/पेमेंट करण्यासाठी पुढे जा वर टॅप करा आणि पेमेंट करण्यासाठी तुमचे पसंतीचे माध्यम निवडा.
टीप: डिलिव्हरी विनंती करण्यासाठी तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये तुमच्याकडे किमान 0.5 ग्रॅम सोने असणे आवश्यक आहे. तुम्ही MMTC किंवा SafeGold वरून सोने खरेदी केले असेल तरच तुम्हाला तुमच्या पत्त्यावर सोन्याची डिलिव्हरी मिळू शकेल. CaratLane वरून खरेदी केलेल्या सोन्यासाठी, तुम्ही CaratLane च्या कोणत्याही रिटेल/ऑनलाइन स्टोअरमध्ये ते विकू शकता किंवा दागिन्यांमध्ये रूपांतरित करू शकता.
तुम्ही खरेदी केल्याच्या तारखेपासून 7 ते 10 कामकाजाच्या दिवसांमध्ये सोन्याचे नाणे किंवा बार वितरित केला जाईल.
महत्त्वाचे: सोन्याच्या वितरित पॅकेजसोबत छेडछाड झाल्याचे दिसल्यास कृपया असे पॅकेज स्वीकारू नका.
अधिक माहितीसाठी पाहा - तुमचे सोन्याचे नाणे किंवा बारच्या डिलिव्हरीच्या स्थितीचा माग घेणे.