MMTC - PAMP अटी व शर्ती
या "अटी व शर्ती" ("अटी") MMTC-PAMP, PhonePe आणि ग्राहक (पक्ष) यांच्यामध्ये लागू कायद्यांच्या अर्थानुसार, कायदेशीररीत्या बंधनकारक आहेत आणि त्या एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करतात. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड एका कॉंप्युटर सिस्टीमद्वारे तयार केले जाते आणि त्यावर कुठल्याही प्रत्यक्ष अथवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नाही. या अटी एक किंवा अधिक पक्षांमधील वेळोवेळी करण्यात आलेल्या इतर कुठल्या अटींसह अतिरिक्त असतील आणि पूर्वीच्या अटींना बाधक नसतील. या अटी आणि शर्ती प्लॅटफॉर्मवर (वेबसाइट, मोबाइल अॅप्स, इतर) होस्ट/प्रदर्शित/प्रकाशित करून MMTC-PAMP आणि MMTC-PAMP भागीदार या अटींना सहमत आहेत आणि स्वीकारत आहेत. प्लॅटफॉर्म अॅक्सेस करून आणि त्यावर व्यवहार करून ग्राहक इथे या अटी आणि शर्तींशी सहमत आहेत आणि त्या स्वीकारत आहेत.
1. या अटी आणि शर्तींमध्ये, संदर्भ पुढीलप्रमाणे असतील:
(a) “GAP” म्हणजे MMTC-PAMP तर्फे ऑफर करण्यात आलेला गोल्ड अॅक्युमलेशन प्लॅन.
(b) “MMTC-PAMP भागीदार” म्हणजे PhonePe जी MMTC-PAMP ने प्लॅटफॉर्मवर ऑफर केलेल्या GAP साठी पेमेंट्सचे संकलन सुलभ करणारी संस्था आहे.
(c) "प्लॅटफॉर्म" याचा अर्थ MMTC-PAMP द्वारे ऑफर केलेल्या कुठल्याही उत्पादनासाठी आणि सेवेसाठी पेमेंट करण्यासाठी ग्राहक अॅक्सेस करत असलेली PhonePe ची मोबाइल अॅप्स अथवा अशी इतर इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म्स.
(e) "तुम्ही/तुम्हाला/तुमचे" अथवा "ग्राहक" म्हणजे MMTC-PAMP द्वारे ऑफर केलेल्या GAP साठी प्लॅटफॉर्मवरून व्यवहार करणारा समोरील पक्ष.
(e) "आम्ही" "आम्हाला", आणि "आमचे" म्हणजे MMTC-PAMP India Private Limited.
(f) "सेवा पुरवठादार" म्हणजे MMTC-PAMP अथवा MMTC-PAMP भागीदार यांच्यासाठी स्वतंत्र तृतीय पक्ष सेवा पुरवठादार.
2. या अटी कधीही बदलण्याचा हक्क आम्ही राखून ठेवत आहोत. असे बदल जेव्हा प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले जातील तेव्हापासून ते प्रभावी आहेत आणि ग्राहकाला सूचित करण्यात आले आहेत असे मानले जाईल. याहून विरुद्ध काहीही असले तरीही, प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या व त्याला कदाचित जोडलेल्या सुधारणा यांच्या समावेशासह असलेल्या अटी आणि शर्ती यांचे नियमितपणे पुनरावलोकन करण्यासाठी ग्राहक जबाबदार असेल आणि त्यांच्याकडून प्लॅटफॉर्मचा वापर सुरू ठेवणे याला ग्राहकाने सुधारणा केलेल्या अटी आणि शर्ती स्वीकारल्या आहेत, असे मानण्यात येईल.
3. MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांना ग्राहकाने पुरवलेली संबंधित माहिती आणि दस्तऐवज गोळा करणे आणि स्टोअर करणे यांचा कायद्यानुसार आवश्यक असलेला हक्क असेल.
4. ग्राहक MMTC-PAMP / MMTC-PAMP भागीदार यांच्याकडून आवश्यक असेल तेव्हा आणि त्यानुसार, KYC आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त दस्तऐवज प्रदान करेल. तुम्ही MMTC-PAMP आणि MMTC-PAMP भागीदार यांना तुमच्या ओळखीच्या वैधतेबद्दल खात्री पटवून घेण्यासाठी आवश्यक असेल तेव्हा अशी चौकशी करण्यासाठी अधिकृत करत आहात. तुम्ही प्रदान केलेल्या तुमच्या सध्याच्या माहितीमध्ये अथवा पडताळणी दस्तऐवजांमध्ये काही बदल झाल्यास तुम्ही MMTC-PAMP आणि MMTC-PAMP भागीदार यांना अपडेट करण्याची जबाबदारी स्वीकारत आहात.
5. MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांना वेळोवेळी दिलेल्या माहितीच्या अचूकतेसाठी तुम्ही जबाबदार आहात. MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांना दिलेल्या माहितीमध्ये काही चूक आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांना लगेचच लेखी कळवले पाहिजे आणि त्यानंतर योग्य/अपडेट केलेली माहिती प्रदान केली पाहिजे.
6. तुम्ही इथे MMTC-PAMP भागीदारांना ग्राहकाच्या नावे MMTC-PAMP च्या वतीने गोल्ड अॅक्युमलेशन प्लॅन (GAP) खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अधिकृत करत आहात. तुम्ही दिलेल्या सर्व रकमेचे सोने लागू कर/चार्ज यांच्या अधीन राहून या संबंधित गोल्ड अॅक्युमलेशन प्लॅन (GAP) खात्यामध्ये दर्शविले जाईल. ग्राहकाकडून MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार यांना सूचना आल्यास, रिडीम करता येण्यासारख्या उत्पादनांच्या कॅटलॉगमधील एखादे उत्पादन निवडण्यासाठी GAP खात्यामधील सोने शिल्लक रिडीम करण्यासाठी वजा केली जाईल. कॅटलॉगमध्ये अशा रिडीम करता येण्यासारख्या उत्पादनांची सूची आणि तपशील असतील आणि ते प्लॅटफॉर्मवर दर्शविलेले असतील. MMTC-PAMP आपल्या विवेकबुद्धीनुसार वेळोवेळी ही रिडीम करता येणारी उत्पादने बदलू शकते, सुधारू शकते आणि दुरुस्त करू शकते.
7. MMTC-PAMP आणि MMTC-PAMP भागीदार हे संयोगाने, KYC कागदपत्रे / दिलेली माहिती चुकीची असल्यास अथवा कागदपत्रे/ माहिती अस्सल नसल्याची शंका आल्यास, तुम्हाला कळवता अथवा न कळवता, कुठलेही सुवर्ण खाते कधीही बंद करण्याचा हक्क राखून ठेवत आहेत. तुमची स्वत:ची ओळख पूर्ण करणे आणि तुमचे खाते लगेच वैध करणे आणि /अथवा कुठल्याही चुकीच्या KYC दस्तऐवज/माहितीमुळे MMTC-PAMP आणि MMTC-PAMP भागीदार यांच्या विरूद्ध उद्भवलेल्या कुठल्याही आणि सर्व नुकसान, दावा, दायित्व यांच्या खर्चासाठी तुम्ही नुकसान भरपाई करणार आहात आणि भविष्यामध्ये करत रहाल याची जबाबदारी तुम्ही इथे घेत आहात.
8. तुम्ही प्लॅटफॉर्मवर दर्शवलेले असल्याप्रमाणे 999.9 शुद्धतेचे सोने किमान किंमत आणि लाइव्ह खरेदी किंमत यानुसार सोने विकत घेण्यासाठी ऑफर करू शकता.
9. तुमचे कार्ड, वॉलेट, UPI अथवा प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या आणि स्वीकार्य असलेल्या पद्धतींने पेमेंट केले जाऊ शकते. तुम्ही Gold SIPs चा पर्याय देखील निवडू शकता आणि Gold SIP निवडल्यास रीकरिंग पेमेंट्सदेखील करू शकता आणि असे पेमेंट हे पेमेंट पर्यायामधून स्वीकारले जाऊ शकते. खरेदी/रीडीम करणे, पुन्हा विक्री यांवेळी, शासनाच्या नियमांनुसार आणि त्यांच्या अधीन राहून आकारले जाणारे संबंधित कर लागू केले जातील.
10. प्रत्यक्ष वितरित करता येण्यासारख्या उत्पादन स्वरुपामध्ये रिडीम करत असताना, ग्राहकाला अतिरिक्त घडणावळ आणि वितरण शुल्क तसेच लागू कर द्यावे लागतील. रिडीम करता येण्यासारखे उत्पादन हे कॅटलॉगमधून निवडावे लागेल आणि वितरण MMTC-PAMP च्या स्टॉक उपलब्धतेवर अवलंबून असेल.
11. ग्राहकाकडून खात्रीशीररीत्या खरेदी केलेल्या सोन्याच्या प्रत्येक खरेदीवर, MMTC-PAMP हे सोन्याचे राखणदार असतील, जोवर:
(a) ग्राहकाकडून पुन्हा विक्री,
(b) ग्राहकाकडून रिडीम करणे, अथवा
(c) राखण कालावधी समाप्त होणे.
या अटींच्या हेतूसाठी, "राखण कालावधी" म्हणजे, MMTC-PAMP ज्या कालावधीसाठी सोने राखून ठेवते तो कालावधी. "मोफत राखण कालावधी" म्हणजे ग्राहकाकडून प्रत्येक वेळी सोने खरेदी केल्यानंतरचा 5 वर्षांचा कालावधी, ज्यामध्ये कुठलेही राखून ठेवण्यासाठीचे शुल्क लागू होत नाहीत. मोफत राखण कालावधी संपल्यावर, MMTC-PAMP कडून लागू शुल्क आकारले जाऊ शकते. तुमच्यातर्फे खरेदी केलेले सोने अथवा तुमच्या सोने खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले सोने हे MMTC-PAMP च्या अतिप्रगत आणि सुरक्षित तिजोरीमध्ये विभागून राखले जाते आणि यासाठी संपूर्ण विमा कव्हर असते.
12. ग्राहकांना जमा झालेल्या सोन्याचा काही भाग अथवा संपूर्ण सोने रिडीम करणे अथवा MMTC-PAMP कडून ऑफर करण्यात आलेल्या रिडीम करता येण्यासारख्या उत्पादनांच्या स्वरुपामध्ये प्रत्यक्ष वितरित करणे यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल. राखून ठेवलेले संपूर्ण सोने रिडीम केल्यावर / ट्रान्सफर केल्यावर उर्वरित अंशात्मक सोने शिल्लक पुन्हा तुम्हाला 999.9 शुद्धतेच्या सोन्याच्या लाइव्ह पुनर्विक्री किमतीने विकता येऊ शकते आणि तुम्ही विकलेल्या उर्वरित अंशात्मक सोन्याच्या किमतीइतकी रक्कम तुम्ही नेमून दिलेल्या बॅंक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते.
13. तुमच्याकडून रिडीम करण्याची प्रक्रिया सुरू आणि पेमेंट मिळाल्यावर, तुमच्या सोने खात्यामधून त्यानुसार तितक्या वजनाचे सोने वजा केले जाईल.
14. MMTC-PAMP भविष्यामध्ये वेळोवेळी, ग्राहकांना त्यावेळी सुरु असलेल्या लाइव्ह पुनर्विक्री किमतीला 999.9 शुद्धतेचे सोने MMTC-PAMP कडून घोषित झालेल्या/ परवानगी दिलेल्या ऑफर कालावधीमध्ये त्यांचे सोने काही भागामध्ये MMTC-PAMP ला परत विकण्याची ऑफर/परवानगी देऊ शकते. ग्राहकाकडून सोन्याचा काही भाग विकल्यावर येणारी रक्कम ग्राहकाकडे जमा करण्यात येईल.
15. MMTC-PAMP कडून उपलब्ध झालेली सोन्याची लाइव्ह खरेदी किंमत ही प्लॅटफॉर्मवर दर्शवली जाईल आणि ती वेळोवेळी बदलांच्या अधीन असेल. प्लॅटफॉर्मवर दर्शवलेली किंमत ही MMTC-PAMP कडून प्लॅटॅफॉर्मवर दाखवलेल्या कालावधीपुरतीच वैध असेल.
16. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या कोणती(त्या)ही पेमेंट पद्धत (ती) वापरताना, MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार ग्राहकांना पुढील बाबतीमध्ये झालेल्या कुठल्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसान अथवा हानीसाठी कुठल्याही पद्धतीने जबाबदार नसतील अथवा कसलेही उत्तरदायित्व स्वीकारणार नाहीत:
(a) कुठल्याही व्यवहारासाठी ऑथरायझेशनची कमतरता
(b) ग्राहक आणि ग्राहकाशी संबंधित बॅंकमध्ये असलेल्या आणि परस्पर सहमती झालेली प्रीसेट मर्यादा ओलांडणे,
(c) व्यवहारामध्ये उद्भवणारे कोणत्याही पेमेंट समस्या
(d) ग्राहक वापरत असलेल्या कुठल्याही पेमेंट पद्धतीमधील बेकायदेशीर व्यवहार (क्रेडीट /डेबिट कार्डचे घोटाळे इत्यादी)
(e) ऑफरसाठी आमंत्रणाची तात्पुरती स्थगिती आणि/अथवा
(f) कुठल्याही कारणाने व्यवहार रद्द होणे.
17. MMTC-PAMP स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार अथवा काही नियामक आदेश अथवा तरतुदीमुळे ग्राहकांना सोने जमा करणे अथवा या योजनेअंतर्गत वेळोवेळी सोने ट्रान्सफर करणे यांसाठी कमाल वैयक्तिक/एकत्रित मर्यादा लावू शकते आणि अशा मर्यादेपेक्षा अधिक असलेली ऑर्डर स्वीकारण्यास नकार देण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.
18. MMTC-PAMP कुठल्याही दिवशी कुठल्याही क्षणी कुठल्याही कारणास्तव ऑफरसाठीचे आमंत्रण तात्पुरते स्थगित करू शकते.
19. ग्राहकांचे सोने खाते हे ग्राहकांना सूचित केल्यानंतर बंद केले जाऊ शकते;
(a) जर त्यांचा राखण कालावधी संपत असेल आणि /अथवा
(b) MMTC-PAMP ने योजना स्थगित करण्याचे ठरविले तर आणि/अथवा.
(c) MMTC-PAMP चे MMTC-PAMP भागीदारासोबत असलेला करार समाप्त/कालबाह्य झाला.
अशा प्रसंगांमध्ये, जमा केलेले सोने पुन्हा विकले जाऊ शकते/रिडीम केले जाऊ शकते अथवा तुमचे सोने खाते सुरू ठेवण्याची खात्री करण्याकरिता आवश्यक पावले उचलली जाऊ शकतात. यापूर्वी नमूद केलेले प्रसंग येऊ घातल्यास, तुम्हाला रिडीम करण्यासाठी सूचित केले जाईल.
20. ग्राहकाचा डिलिव्हरीकरिता दिलेला पोस्टल पिन कोड हा जर सेवा पुरवता येणार्या क्षेत्राच्या बाहेरचा असेल तर ग्राहकाला रिडीम करण्याची विनंती करण्याचा हक्क नसेल. रिडीम करण्याच्या वेळी, ग्राहकाने पूर्ण डिलिव्हरी पत्ता देणे आवश्यक असेल.
21. ग्राहकाकडून रिडीम करण्यासाठी निवडलेली सर्व रिडीम करता येण्यासारखी उत्पादने भारतामधील सेवा पुरवता येण्यासारख्या क्षेत्रामध्ये आमच्या लॉजिस्टिक्स भागीदारांना ग्राहकाने दिलेल्या सूचनांनुसार डिलिव्हर करण्यात येतील. सर्व डोलिव्हरीज या जिथे लागू असेल तिथे सर्वोत्तम प्रयत्नांमध्ये देण्यात येतील आणि जरी MMTC-PAMP ने नेमलेले लॉजिस्टिक्स भागीदार सूचित केलेल्या तारखेला उत्पादने डिलिव्हर कराण्याचा प्रयत्न करतील, MMTC-PAMP याबाबतीत झालेली दिरंगाई/सेवा न पुरवली जाणे यामधून उद्भवणार्या कुठल्याही दाव्यासाठी अथवा उत्तरदायित्वाची जबाबदारी स्वीकारत नाही. सेवा पुरवता येण्यासारखी क्षेत्रे ही वेळोवेळी बदलू शकतात. शिपमेंट्सच्या डिलिव्हरीबाबत झालेल्या कुठल्याही वादाबद्दल MMTC-PAMP च्या पत्त्यावर संपर्क साधला जावा.
22. MMTC-PAMP चे लॉजिस्टिक भागीदार तुमची ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी कमाल तीन प्रयत्न करतील. तीन प्रयत्नांनंतर MMTC-PAMP चे रिडीम करण्यासारखे उत्पादन/ सोन्याचे कॉइन हे पुन्हा MMTC-PAMP ला परत डिलिव्हर करण्यात येईल आणि MMTC-PAMP GAP खात्यामध्ये तितक्ल्याच सोन्याच्या रकमेची सोने शिल्लक अपडेट करेल आणि ग्राहकाला रिडीम करण्यासाठी नव्याने विनंती करावी लागेल. काही अनपेक्षित कारणांमुळे जर डिलिव्हरी पूर्ण होऊ शकली नाही तर, सोने परत MMTC-PAMP कडे परत येईल आणि तुमचे GAP खात्यामधील तुमची सोने शिल्लक हे असे सोने समाविष्ट करून अपडेट करण्यात येईल.
23. प्लॅटफॉर्मवरील कुठल्याही तांत्रिक बिघाड/समस्या आणि/अथवा MMTC-PAMP ची विशेषता नसलेल्या कृती/वगळणे यामधून उद्भवणार्या अथवा याच्याशी संबंधित कुठलीही हानी / उत्तरदायित्व यांसाठी हे कुठल्याही पद्धतीने कधीच उत्तरदायी/जबाबदार असणार नाहीत.
24. इथे नमूद केलेल्या कुठल्याही बाबतीशी विरोधाभास व्यक्त न करता, इंटरफेस आणि API काम हे आणि त्याच्याशी संबंधित माहिती, किमती आणि डेटा व उपलब्धता, यामध्ये मर्यादेशिवाय समाविष्ट असेल तसेच पूर्णपणे किंवा काही प्रमाणामध्ये संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, टेलिकम्युनिकेशन्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम्स, डेटाबेस अथवा व्यवसाय प्रक्रिया आणि पद्धती यामध्ये असलेल्या इतर समस्या अथवा त्याच्याशी संबंधित असलेल्या इंटरनेटचा वापर, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या समावेशासह परंतु यापुरतेच मर्यादित नसलेल्या, दैवाधीन कार्य घटना, शासकीय/नियामक कृती आदेश, सूचना इत्यादि आणि/अथवा आणि तृतीय पक्षांकडून केलेल्या कृती अथवा वगळणे यांच्याशी संबंधित असेल अथवा त्यामधून निर्माण झालेले असेल, अशा सेवा, इंटरफेस अथवा API कार्य, याची माहिती आणि डेटा अथवा अशा कम्युनिकेशनमधून झालेल्या या कुठल्याही क्षणी आणि वेळोवेळी मानवी, मेकॅनिकल, टायपोग्राफिक, किंवा इतर एरर्स, नजरचुका, चुका, मर्यादा, दिरंगाई, सेवा व्यत्यय यांच्या अधीन असतील. ग्राहक हे जाणून घेतात आणि सहमती देतात की, अशा समस्यांमुळे अथवा त्यातून निर्माण झालेल्या पूर्ण अथवा अंशात्मक दिरंगाई, अयश्स्वी होणे अथवा इतर नुकसानीसाठी कुठल्याही पद्धतीने MMTC PAMP जबाबदार अथवा उत्तरदायी नसेल. जर तुमचे सोने खात्यामध्ये वर नमूद केलेल्या घटनाप्रसंगामुळे जास्त पैसे जमा झाले अथवा चुकीने पैसे कमी झाले/ जमा झाले तर, MMTC PAMP स्वत:च्या विवेकबुद्धीने तुमच्या सोने खात्यामधून अथवा खात्यामध्ये सोने जमा करणे / वजा करणे- जे काही आवश्यक असेल तसे करण्यासाठी सूचना न देता व्यवहार माघारी घेणे/ रद्द करणे , अथवा अशा व्यवहारांसाठी आवश्यक असलेले रद्दीकरण/ माघारी घेणे हे सर्व करण्याचा हक्क राखून ठेवत आहे. तुमच्याकडून सोने इतर खात्यामध्ये (यामध्ये वेगळा वापरकर्ता/ग्राहक याचा समावेश आहे परंतु ते त्यापुरतेच मर्यादित नाही) चुकीने ट्रान्सफर केल्यास MMTC-PAMP उत्तरदायी असणार नाही आणि सोने ग्रॅम्स हे तुमच्या चुकीने झालेल्या ट्रान्सफर आणि /अथवा ज्या व्यक्तीकडे ट्रान्सफर झाले आहे, त्याने ट्रान्सफर झालेल्या सोन्याचा आधीच व्यवहार केलेला असल्यास, परत तुमच्या खात्याकडे कदाचित येऊ शकणर नाहीत.
25. ग्राहकाने त्याच्या / तिच्या सोने खात्यामधल्या सोन्याची खरेदी, रिडीम करणे, पुन्हा विक्री करणे याची MMTC-PAMP कडून खात्री केल्यानंतर, ग्राहकाची खरेदी/रिडीम करणे/पुन्हा विक्री करणे/ट्रांस्फर करणे यांपैकी हे काही असेल ते, ग्राहकाला बंधनकारक असेल आणि ते रद्द करता येणार नाही.
26. ग्राहकाच्या सोने खात्यामध्ये जर काही अनियमितता अथवा तफावत असेल, तर त्याने/तिने [30] दिवसांच्या आत ताबडतोब कळवले पाहिजे, जर असे करण्यात आले नाही तर त्या खात्यामध्ये चुका अथवा तफावत नाही असे मानण्यात येईल. ग्राहकांकडून आलेल्या सूचनांचे आणि इतर तपशील (ज्यामध्ये दिलेली अथवा मिळवलेली पेमेंट्स यांचा समावेश आहे परंतु ते त्यापुरतेच मर्यादित नाही) यांची MMTC-PAMP तर्फे इलेक्ट्रॉनिक अथवा दस्तऐवज स्वरुपामध्ये ठेवण्यात आलेली सर्व रेकॉर्ड ही ग्राहकाच्या विरूद्ध अशा सूचनांचा निर्णायक पुरावा मानण्यात येईल.
27. ग्राहक हे जाणून आहे आणि सहमती देत आहे की, सोने खात्यामध्ये /खात्यामधून केलेली कोणतीही खरेदी, रिडीम करणे, पुन्हा विक्री करणे अथवा ट्रान्सफर हे ग्राहकाकडून मिळालेल्या सूचनेनुसार केली जाईल आणि ग्राहक त्यावेळी भारतामध्ये अथवा भारताबाहेर असलेला कोणताही लागू कायदा अथवा नियम यांचे उल्लंघन करणार नाही. ग्राहक सोने खात्यामधून अथवा खात्यामध्ये खरेदी, रिडीम करणे, पुन्हा विक्री करणे याच्या संदर्भामध्ये लागू कायदे ज्यामध्ये दुरूस्तीच्या समावेशासह आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा 2002, बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायदा 1998, इन्कम टॅक्स कर 1961 यांचा समावेश आहे परंतु ते तितकेच मर्यादित नाही. ग्राहक कुठल्याही अज्ञान व्यक्तीच्या नावे कुठलेही खाते उघडणार नाही यासाठी सहमती देत आहे, आणि याची खात्री देत आहे. याबाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीने MMTC-PAMP उत्तरदायी असणार नाही.
28. ग्राहकाकडून उत्पादनांबाबत आलेला प्रतिसाद हा गोपनीय नसल्याचे आणि भरपाईसाठी नसल्याचे मानण्यात येईल. MMTC-PAMP स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार, अशी माहिती स्वत:च्या अंतर्गत उद्देशांसाठी वापरण्याचा हक्क राखून ठेवत आहे.
29. या अटी भारताच्या कायद्यानुसार शासित असतील आणि त्यांची व्याख्या व अन्वय हा त्यानुसारच लावला जाईल. यांमधून उद्भवणार्या कुठल्याही वादविवादासाठी नवी दिल्लीमधील न्यायालयांचे अधिकारक्षेत्र केवळ असेल.
30. या इथे नमूद केलेल्या अटीसंदर्भामध्ये अथवा त्याच्याशी संबंधित ज्यामध्ये त्यांची वैधतादेखील समाविष्ट आहे, काही विवाद उपस्थित झालाच तर अशावेळी इथे नमूद केलेले पक्ष आधी असा विवाद आपापसामध्ये सामंजस्यामध्ये सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. आपापसामधील सामंजस्याने विवाद सोडवण्याचा प्रयत्न हा अयशस्वी तेव्हाच मानण्यात येईल, जेव्हा वाजवी प्रयत्नांनंतर (जे 15 पंधरा कॅलेंडर दिवसांहून जास्त दिवस चालतील) समोरील पक्षाला लेखी सूचना देऊन कळवतील.
31. हक्कसोड: MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांच्याकडून या अटी आणि शर्ती अथवा त्यांच्याशी संबंधित हक्कांची अंमलबजावणी अथवा पूर्तता होणे यामध्ये कुठलीही दिरंगाई अथवा अपूर्णता असल्यास MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांनी ती तरतूद अथवा हक्क यावर हक्कसोड केल्याचे मानले जाणार नाही. MMTC-PAMP यांना या अटीअंतर्गत, कायद्याअंतर्गत, नि:पक्षपातीपणाने उपलब्ध असलेल्या कुठल्याही हक्कांच्या अथवा उपायांच्या MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांच्या हक्कांची एक किंवा अनेक वेळा असलेल्या अंमलबजावणीसाठी असलेला हक्कसोड अथवा अटकाव येथे मानला जाणार नाही.
32. अपरिहार्य घटना : MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांची या अटीअंतर्गत असलेली कामगिरी जर कर्मचारी वाद, संप, दैवाधीन कार्य, पूर, वीज पडणे, तीव्र हवामान, सामानाची कमतरता, रेशनिंग, कुठल्याही व्हायरसचे आमिष, ट्रोजन अथवा इतर व्यत्यय आणणारी यंत्रणा, हॅकिंग अथवा प्लॅटफॉर्मचा बेकायदेशीर वापर, युटिलिटी अथवा कम्युनिकेशन बंद पडणे, भूकंप, युद्ध, क्रांती चळवळ, दहशतवादी कृत्ये, अराजकीय गडबड, जनतेच्या शत्रूंची कूत्ये, ब्लॉकेड, एम्बार्गो अथवा इतर कायदा, सुव्यवस्था, जाहीरनामा, नियामने, अध्यादेश, शासनाकडून अथवा इतर न्याययंत्रणेकडून अथवा अशा शासकीय प्रतिनिधीकडून आलेली कायदेशीर आधार असलेली मागणी अथवा आवश्यकता किंवा या कलमामध्ये नमूद केलेल्यासारखी अथवा त्याहून भिन्न असलेली कोणतीही कृती, ज्या MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांच्या वाजवी नियंत्रणाच्या पलिकडे आहेत, अशा कारणांमुळे प्रतिबंधित, स्थगित होणे, विलंब होणे अथवा हस्तक्षेप होत असेल तर, MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार अशा कामगिरीमधून अशा अपरिहार्य घटनांच्या अधीन आणि त्या कालावधीदरम्यान सोडवले जातील आणि डिस्चार्ज केले जातील, आणि अशा पद्धतीची अपूर्ण कामगिरी कुठल्याही पद्धतीने MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांच्या कर्तव्यांचा भंग मानली जाणार नाही.
33. कुठलेही इतर संबंध नाहीत: तुम्ही MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांना प्रतिनिधित्व करता आणि खात्री देत आहात की, तुम्हाला सोने/रिडीम करता येण्यासारखी उत्पादने यांची खरेदी/रिडीम करणे/ पुन्हा विक्री करणे याबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेण्यासाठी पुरेसा अनुभव आणि ज्ञान तुमच्याकडे आहे. तुम्ही सहमती देत आहात की, खरेदी करणे अथवा रिडीम करणे अथवा पुन्हा विक्री करणे याबाबत तुमचे सर्व निर्णय तुम्ही स्वत: घेत आहात आणि तुम्ही MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांनी उपलब्ध करून दिलेल्या कुठल्याही माहितीवर अवलंबून नाही आहात. त्याहून पुढे, MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार अशा पद्धतीच्या सोने/रिडीम करता येण्यासारखी उत्पादने यांची खरेदी/रिडीम करणे/पुन्हा विक्री करणे यासंदर्भात तुम्हाला कुठलीही शिफारस करत नाही आहेत. तुम्ही आणि MMTC-PAMP यांच्यामध्ये विक्रेता-खरेदीदार व्यतिरिक्त कुठलेही इतर संबंध नाही, यामध्ये कुठलेली एजंट-प्रिन्सिपल संबंध, कुठलेली सल्लागार-सल्ला घेणारा संबंध, कुठलेही कर्मचारी-मालक संबंध, कुठलेही फ्रॅंचायझी-फ्रॅंचायझर संबंध, कुठलेही जॉइंट व्हेंचर संबंध अथवा कुठलेही भागीदार संबंध यांचा समावेश आहे परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही.
34. इलेक्ट्रॉनिक ऑर्डर धोका: ऑर्डर्स एंटर करण्याकरिता एक प्रभावी आणि विसंबण्याजोगी पद्धत प्रदान करण्यासाठी ऑर्डर एंट्री सिस्टीम्स डिझाइन करण्यात आलेल्या आहेत. व्यावसायिक इंटरनेट सेवा प्रदाते हे 100% विश्वासू नाहीत आअणि यांपैकी एक किंवा अनेक पुरावठादार अयशस्वी ठरल्याने इंटरनेट आधारित ऑर्डर एंट्रीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही सहमती देता, की ऑर्डर एंट्री सिस्टीम ही एक इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल सिस्टीम आहे आणि ती MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांच्या नियंत्रणाच्या बाहेर अयशस्वी होऊ शकते. त्यामुळे ट्रान्समिशन अथवा कम्युनिकेशन सुविधांच्या नादुरूस्त असल्याने अथवा काम न केल्याने होणार्या अथवा MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांच्या नियंत्रणाच्या अथवा अपेक्षेच्या पलिकडे असलेल्या कुठल्याही चुकी, निष्काळजीपणा, ऑर्डर पूर्ण न करण्याची क्षमता, ट्रान्समिशन, डिलिव्हरी अथवा ऑर्डर पूर्ण करणे यांमधील उशीर यांना MMTC-PAMP भागीदार /MMTC-PAMP जबाबदार असणार नाहीत. तुम्ही याला सहमती देता, की किमतीमध्ये अथवा टाईप करताना चुका होऊ शकतात आणि किमतीमध्ये अथवा उत्पादन माहितीमध्ये चूक असल्यामुळे एखादे उत्पादन चुकीच्या किमतीने अथवा चुकीच्या माहितीसह सूचीमध्ये आहे, असे घडल्यास MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार हे स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार अशा उत्पादनांसाठी आलेल्या कुठल्याही ऑर्डर्स नाकारण्याचा, रद्द करण्याचा अथवा मनाई करण्याचा हक्क राखून ठेवत आहेत. तसेच पुढे जाऊन, MMTC-PAMP बाजारामधील अस्थिरता आणि/अथवा विलक्षण परिस्थिती अथवा अवस्थेमध्ये कुठल्याही ऑर्डर्स नाकारण्याचा, मना करण्याचा अथवा रद्द करण्याचा हक्क राखून ठेवत आहेत.
35. कर, दर आणि शुल्क यासंदर्भामध्ये ग्राहकाची जबाबदारी: तुम्ही याला सहमती देता, की सोने/रिडीम करता येण्यासारखी उत्पादने यांच्या खरेदी/रिडीम करणे यामधून निर्माण होणारे सर्व कर, दर आणि शुल्क यांच्यासाठी पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात. MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार हे केवळ कायद्याने आवश्यक असलेले अशा व्यवहारापुरतेच कर, दर आणि शुल्क संकलित करतील. कुठल्याही स्थानिक, राज्य आणि/अथवा प्रशासनाच्या अधीन असलेले कुठलेही कर, दर आणि शुल्क यांबाबत जागरूक असणे आणि त्यांची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला कर, दर आणि शुल्के याबाबत काही शंका असतील तर, तुमच्या एकमेव परिस्थितीबद्दल तुम्ही कर अथवा यासंबंधित इतर व्यावसायिकाचा सल्ला घ्यावा. MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार तुमच्या ठरावीक कर, दर आणि शुल्क यांसाठी सल्ला अथवा शिफारस करण्याचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
36. नुकसान भरपाई: ग्राहक इथे सहमती देत आहे, की ते MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार अथवा त्यांचे कर्मचारी, एजंट, कामगार अथवा प्रतिनिधी यांना कुठल्याही वेळी सहन करावे लागणारे, उद्भवणारे, येणारे अथवा परिणामी भोगावे लागणारे सर्व प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कृती, दावे, मागण्या, प्रक्रिया, हानी, इजा, वैयक्तिक इजा, दर, शुल्क आणि खर्च यांसाठी आणि यांच्या बदल्यात कुठल्याही पद्धतीचे ('नुकसान') MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार यांना नुकसानभरपाई देतील आणि देत राहतील.
(a) ग्राहकाकडून केला जाणारा प्लॅटफॉर्मचा वापर;
(b) ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे, चुकीमुळे अथवा गैरव्यवहारामुळे उद्भवलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या आलेल्या ग्राहकाच्या सूचनांवर MMTC-PAMP कडून विश्वासपूर्वक करण्यात आलेल्या कृती अथवा कृती करण्यास नकार अथवा कृती करण्यास वगळणे या कारणांस्तव;
(c) सोने खात्याशी संबंधित आणि अटींचा भंग अथवा पालन न करणे आणि/अथवा
(d) ग्राहकाकडून कुठल्याही व्यवहाराबाबतीत झालेला कसलाही घोटाळा अथवा अप्रामाणिकपणा.
अगोदर निर्देशित बाबीसंबंधी बोलताना, कोणताही पूर्वग्रह न ठेवता, कुठलाही पक्ष खालील बाबतींमध्ये उद्भवणार्या कोणत्याही हानी अथवा नुकसानासाठी ग्राहकाला उत्तरदायी असणार नाही:
(i) ग्राहकाकडून आलेल्या सूचनांनुसार व्यवहार करत असताना,
(ii) ग्राहकाकडून त्याच्या/तिच्या सोने खात्यामधील सोने इतर सोने खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याची सूचना आल्यास,
(iii) MMTC-PAMP कडून प्लॅटफॉर्मवर पुरवलेल्या सेवा/सुविधा यांचा वापर संपवणे/वापरणे यांच्या हक्काचा वापर केल्यास,
(iv) प्लॅटफॉर्मवरील सेवा/सुविधा यांच्या वापरामुळे ग्राहकाच्या क्रेडिटला, चरित्राला अथवा किर्तीला कशाही पद्धतीची इजा पोचल्यास,
(v) MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार यांच्याकडून आलेल्या कुठलीही प्रक्रिया, समन्स, आदेश, अंमलबजावणी, एक्झिक्युशन डिस्ट्रेट, लावलेले शुल्क माहिती अथवा सूचना यांची पोच देणे जिथे MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार, ग्राहकाला अथवा अशा कुठल्याही इतर व्यक्तीबद्दल उत्तरदायित्व न बाळगता त्यांच्या पर्यायानुसार, ग्राहकाला त्याच्या सोन्याचा कुठलाही भाग मिळवण्याची अनुमती नाकारू शकतात, अथवा असे सोने योग्य अधिकारी संस्थेकडे सुपूर्द करू शकतात आणि लागू कायद्यानुसार आवश्यक ती पावले उचलू शकतात.
37. अस्वीकरण आणि दायित्वाच्या मर्यादा: MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार भविष्यामधील किमती अथवा गुंतवणुकीवरील परतावा या संदर्भामध्ये व्यक्त किंवा निहितप्रकारे सोन्याची कामगिरी/ अथवा Gold SIPs किंवा अन्यथा कुठल्याही पद्धतीचे कसलेही वर्णन, शिफारस, अंदाज, वॉरंटी अथवा गॅरंटी देत नाहीत. MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार हे कुठल्याही ग्राहकाला (यामध्ये हस्तांतरितच्या समावेश आहे, परंतु ते त्यापुरतेच मर्यादित नाही) इतर कुठल्याही ग्राहकाला सोने खात्यामधून सोने ट्रान्सफर/जमा करत असताना झालेल्या अथवा त्याच्याशी संबंधित कुठल्याही नुकसानीला उत्तरदायी असणार नाहीत. MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार हे पावतीवर सही करण्यापूर्वी अथवा पॅकेज मिळण्यापूर्वी कसल्याही पद्धतीचे नुकसान अथवा छेडछाड झाली आहे का याची तपासणी करण्याची स्पष्ट विनंती सर्व ग्राहकांना करत आहेत. जर तुम्हाला काही छेडछाड आढळलीच, तर ते पार्सल ताब्यात न घेता परत पाठवून द्यावे. ग्राहकाने नुकसान झालेले अथवा छेडछाड झालेले पार्सल स्विकारल्यास झालेल्या कुठल्याही नुकसानीला अथवा हानीला MMTC-PAMP जबाबदार असणार नाही. पार्सलला काही नुकसान अथवा छेडछाड झाली आहे का हे तपासण्याचे कर्तव्य ग्राहकाचे आहे आणि जर ग्राहकाने पार्सल स्वीकारले आणि नंतर काही नुकसान अथवा छेडछाड झाल्याचे लक्षात आले तर, MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार हे ग्राहकाला झालेल्या कुठल्याही नुकसानीला अथवा हानीला उत्तरदायी असणार नाहीत. ग्राहक सोने/उत्पादन मिळाल्यानंतर 10 दिवसांच्या आत MMTC-PAMP/MMTC-PAMP भागीदार यांना संपर्क साधून सोने/उत्पादन यासंदर्भामध्ये कुठलीही तक्रार/गार्हाणे असल्यास ते मांडू शकतात आणि चौकशीनंतर MMTC-PAMP त्यांना योग्य निराकरण देऊ शकते.
38. तुम्ही हे कबूल करता, की MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार हे तुम्हाला अथवा इतर कुठल्याही व्यक्तीला सोन्याचा तुमचा अॅक्सेस अथवा वापर यामुळे निर्माण होणार्या अप्रत्यक्ष, परिणामी, विशेष, अनुषंगिक, दंडात्मक अथवा अनुकरणीय हानीसाठी, यामध्ये निष्काळजीपणा, नुकसानभरपाईची सोय असलेला दिवाणी गुन्हा, करार किंवा दायित्वाच्या इतर सिद्धांतामध्ये हे वैशिष्ट्यीकृत केलेले असो वा नसो, तसेच, ज्यामध्ये गमावलेला नफा, गमावलेली बचत आणि गमावलेला महसूल (एकत्रितरीत्या "वगळलेली हानी") यांचा समावेश आहे परंतु ते त्यापुरतेच मर्यादित नाही, उत्तरदायी असणार नाहीत. कुठल्याही घटनेच्या बाबतीत, MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार अथवा त्यांचे संचालक, कर्मचारी हे उत्तरदायी असणार नाहीत. या अटीअंतर्गत आणि MMTC-PAMP/ MMTC-PAMP भागीदार यांनी पुरवलेल्या सुविधा/सेवा यांच्या अंतर्गत सर्व नुकसान, हानी, उत्तरदायित्व आणि कृतीसाठी कारणे ही जर काही असलीच तर, तुम्ही दिलेल्या एकत्रित रकमेपेक्षा जास्त असू शकणार नाहीत.
39. लागू अधिकारक्षेत्रामध्ये दायित्वाची पूर्वगामी मर्यादा कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत लागू होईल.
40. तुम्ही घोषित करत आहात, की तुमची केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017, राज्य वस्तू आणि कर सेवा कायदा 2017, एकत्रीकरण वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 यांअंतर्गत नोंदणी झालेली नाही, अथवा तशी नोंदणी करण्याची आवश्यकता नसलेली व्यक्ती आहात.
41. तुम्ही घोषित करत आहात, की तुमच्या खात्यामधले पूर्वी तुमच्या मालकीचे असलेले सोने तुम्ही वैयक्तिक वापरासाठी विकत आहात.
42. तुम्ही घोषित करत आहात, की तुम्ही सोने आणि चांदी अथवा इतर कुठल्याही मौल्यवान धातूच्या दागिन्यांचे अथवा संबंधित उत्पादनांचे नोंदणीकृत नसलेले विक्रेता नाही आहात.
43. तुमच्याकडून कुठलीही चुकीची माहिती आलेली आढळल्यास, त्यामुळे कुठल्याही अधिकारीवर्ग, संस्था अथवा शासन यांच्याकडून कुठल्याही कालावधीमध्ये उद्भवणार्या सर्व प्रकारचे दंड, आकारणी, कर, शुल्क, व्याज अथवा सारा यांच्यासाठी केवळ तुम्ही स्वत: जबाबदार असाल.