वापराच्या अटी - सोने

हे दस्तऐवज, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या अनुसार, त्यात वेळो-वेळी होणाऱ्या दुरुस्त्या आणि त्याच्या अंतर्गत लागू नियम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 द्वारे दुरुस्ती केलेल्या विविध नियमांतील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधित दुरुस्तीच्या तरतूदींशी संबंधित एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कंप्युटर सिस्टम ने जनरेट होतात आणि यासाठी कोणत्याही वास्तविक किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नसते.

या वापराच्या अटींमध्ये (“अटी”), “PhonePe” / “आम्ही” / “आम्हाला” / “आमचे” संदर्भातील कोणतेही संदर्भ हे PhonePe प्रायव्हेट लिमिटेडसाठी असतील, कंपनी अधिनियम 1956 अंतर्गत ही कंपनी समाविष्ट असून, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ऑफिस-2, 5 वा मजला, विंग ए, ब्लॉक ए, सलारपुरिया सॉफ्टझोन,बेलंदूर व्हीलेज, बंगलोर, बंगलोर साउथ, कर्नाटक - 560103, भारत येथे आहे. प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्ससाठी पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अधिनियम 2007 अंतर्गत, PhonePe ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘पेमेंट सिस्टम ऑपरेटर’ म्हणून अधिकृत केले आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस (“UPI”), इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॉलेट आणि इतर वित्तीय सेवांद्वारे PhonePe पेमेंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स ऑफर करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे.

PhonePe सेवांचा वापर करताना, तुम्ही या वापराच्या अटी ("अटी") सोबत बांधील असल्याचे तसेच https://www.phonepe.com/terms-conditions/ यावरील उपलब्ध PhonePe नियम व अटी (“PhonePe नियम आणि अटी”), आणि https://www.phonepe.com/privacy-policy/ यावरील उपलब्ध गोपनीयता धोरण आणि PhonePe ने वेळोवेळी जारी केलेल्या अन्य लागू अटी, धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांना सहमती देत आहात, याबरोबरच या अटींशी बांधील असल्याचेही मान्य करता. जेव्हा "ग्राहक" / "युजर" / "तुम्ही" / "तुमचे" असे संदर्भ येतील तेव्हा ते युजर म्हणून, तुम्ही सोने खरेदीचे पेमेंट करण्यासाठी आमच्या पेमेंट तंत्रज्ञान उपाययोजना वापरताना, सोन्याच्या वितरणासाठी विनंती करताना आणि सोने भागीदारांना पुन्हा सोने विकताना तुमच्याशी संदर्भित असतील. PhonePe डाउनलोड करताना, अ‍ॅक्सेस किंवा वापर करताना, तुम्ही पुढील अटींचे पालन कराल आणि या अटींशी बांधील राहाल यासाठी सहमती देता:

1. खालील शब्द आणि वाक्य यांच्या अर्थ किंवा संदर्भांकडे दुर्लक्ष होत नाही तोपर्यंत त्याचे पुढील अर्थ असणे आवश्यक आहे:

1.1 सोने भागीदार” म्हणजे PhonePe प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक इंटरफेसद्वारे युजरकडून / युजरद्वारे सोन्याची विक्री / वितरण किंवा पुन्हा खरेदी करणारी कंपनी आहे आणि अशा प्रकारचे व्यवहार प्रक्रिया करणे/पेमेंट करणे यासाठी आमच्या पेमेंट तंत्रज्ञान उपाययोजनांचा वापर करत आहे. पेमेंट प्रक्रियेसाठी / सुलभ करण्यासाठी आमच्या देयक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. PhonePe कडे पुढील दोन (2) सोने भागीदार आहेत:

a) डिजिटल गोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट असून, 1902 टॉवर, बी पेनिनसुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई, महाराष्ट्र 400013 या नोंदणीकृत कार्यालयासह  “SafeGold” या ब्रँड अंतर्गत कार्यरत आहे; आणि

b) MMTC-PAMP इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी, कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट असून, C-27, तिसरा मजला, कुतुब इंन्स्टिट्यूशनल एरिया, नवी दिल्ली - 110016 या नोंदणीकृत कार्यालयासह “MMTC-PAMP” या ब्रँडअंतर्गत कार्यरत आहे.

1.2 “PhonePe प्लॅटफॉर्म” - या अंतर्गत सोने भागीदारांसह युजर्सला आणि व्यवसाय भागीदारांना सेवा पुरवणाऱ्या PhonePe च्या मालकीच्या/संचालित असलेल्या कोणत्याही व्यासपीठांचा (जे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (“UPI”), इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, वॉलेट आणि इतर वित्तीय सेवांच्या माध्यमातून पेमेंट तंत्रज्ञानाचे उपाय देणाऱ्या व्यवसायात गुंतलेले आहेत) संदर्भ येतो यात वेबसाइट, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन, डिव्हाइस, URLs/लिंक, सूचना, चॅटबॉट किंवा इतर कोणत्याही संप्रेषण माध्यमांचा समावेश आहे, पण यांपुरतेच प्लॅटफॉर्म मर्यादित नाहीत.   

1.3 “उत्पादन” म्हणजे सोने भागीदारांनी ग्राहकांना डिजिटल आणि प्रत्यक्ष स्वरूपात देऊ केलेले सोन्याचे प्रकार होय. 

2. तुम्ही येथे पुष्टी करता, की तुम्ही PhonePe नियम व अटीमध्ये निर्दिष्ट केलेल्या पात्रतेचे निकष पूर्ण करता आणि तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मचे नोंदणीकृत युजर आहात.

3. तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला हे समजले आहे, की आमची भूमिका केवळ पेमेंट प्रक्रिया करण्यापुरतीच मर्यादित आहे. आम्ही बाजारपेठ नाही आणि आम्ही अशा कोणत्याही सेवा युजर्सला किंवा सोने भागीदारांना देत नाही. आम्ही उत्पादन विक्रेता नाही तसेच ऑर्डर पूर्ततेसाठीही आम्ही जबाबदार नाही.

4. तुम्ही सहमत आहात आणि तुम्ही समजून घेता, की आम्ही सोने भागीदारांद्वारे ऑफर करण्यात आलेल्या उत्पादन आणि सेवा निश्चित करत नाही, त्यासाठी सल्ला देत नाही किंवा कोणत्याही प्रकारे किंमतींना नियंत्रित करत नाही.

5.व्यवहार प्रक्रियेच्या हेतूसाठी, तुम्ही आम्हाला चालू आधारावर तुमच्याद्वारे पुरवलेल्या माहितीमध्ये प्रवेश करणे, मिळवणे, शेअर करणे, वापरणे, संग्रहित करणे यासाठी अधिकृत करता. तुम्हाला माहिती आहे, की अचूक माहितीला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि तुम्ही आम्हाला पुरवलेल्या अचूक माहितीसाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. तुम्ही आम्हाला पुरवलेल्या माहितीत त्रुटी आहे, असे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ताबडतोब याची माहिती आम्हाला लिखित स्वरूपात द्याल आणि त्वरित अचूक/ अद्ययावत माहिती पुरवाल. तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला हे समजले आहे, की आम्ही तुमच्याद्वारे प्रदान केलेल्या डेटा/माहितीचे पुनरावलोकन करू शकतो आणि जोखीम व्यवस्थापनासह त्यावर कार्य करू शकतो. योग्य कार्य करणे आणि जोखमी व्यवस्थापनेचा भाग म्हणून, तुमच्याशी संबंधित असलेली माहिती, आम्ही सार्वजनिकरित्या किंवा आमच्या व्यावसायिक भागीदारांद्वारे किंवा सेवा प्रदात्यांद्वारे उपलब्ध असलेल्या स्रोतांकडून आणू शकतो. चुकीची माहिती सबमिट केल्यामुळे तुम्हाला झालेल्या नुकसानीसाठी किंवा हानीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

6.तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला हे समजले आहे, की सोन्याचे भाव सांगणे, तुम्हाला उत्पादन विक्री/ वितरण करणे, ऑर्डर पूर्ण करणे, तुम्ही प्रत्यक्ष/डिजिटल स्वरूपात खरेदी केलेले उत्पादन संग्रहित करणे आणि या उत्पादनाची तुमच्याकडून पुन्हा खरेदी करणे यासाठी सोने भागीदार पूर्णपणे जबाबदार आहेत. सोने भागीदार उत्पादन विक्रेते आहेत. सोने भागीदार उत्पादनाच्या वितरणासाठी, तसेच उत्पादन किंवा सेवेतील कमतरतेसाठी पूर्णपणे जबाबदार आहेत. सोने भागीदाराने देऊ केलेल्या उत्पादनामध्ये आणि/किंवा सेवांमध्ये कोणत्याही कमतरतेसाठी PhonePe जबाबदार राहणार नाही. तुम्ही उत्पादनाच्या कोणत्याही गुणवत्तेची/परिमाण संबंधित समस्यांसाठी किंवा सोने भागीदारांद्वारे उत्पादनाचे वितरण न झाल्यास/विलंब झाल्यास यासाठी PhonePe ला जबाबदार धरू नये.

7.तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला हे समजले आहे, की सोने भागीदार विक्रीद्वारे ऑफर केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता (शुद्धता आणि सर्व संबंधित बाबी), वितरण केल्या जाणाऱ्या उत्पादनाचे अचूक वजन, मोजमाप, सोने सामग्री किंवा उत्पादनाची शुद्धता आणि तुम्ही निर्दिष्ट केलेल्या पत्त्यावर वितरणाच्या वेळी असलेली उत्पादनाचे स्वरूप आणि अस्सलपणासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत.

8. सोने भागीदाराने दिलेली उत्पादने आणि सेवा, त्याची स्थिती, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी त्याची तंदुरुस्ती इत्यादी संदर्भात PhonePe कोणतेही (व्यक्त किंवा सूचित) प्रतिनिधित्व करत नाही किंवा हमी देत ​​नाही.

9. तुम्ही सहमत आहात आणि तुम्ही मान्य करता, की संबंधित सोने भागीदार इनव्हॉइस, वॉरंटी कार्ड, विक्रीनंतरच्या सेवा इत्यादी पुरवण्यासाठी पूर्णपणे जबाबदार असेल. PhonePe अशा किंवा यासारख्या कोणत्याही परिस्थितीसाठी जबाबदार असणार नाही. तुमच्या सोने भागीदारासोबत उत्पादन/सेवा यासंबंधात असलेले वाद/तक्रार/गाऱ्हाणे (वितरण, ऑर्डर पूर्ण न करणे, उत्पादनाचा दर्जा चांगला नसणे, सेवेत कमतरता असणे, विक्रीनंतरच्या सेवा इत्यादी) सोने भागीदाराकडेच न्याल. तथापि, आम्ही सोन्याच्या विक्री/खरेदीसाठी पेमेंट प्रक्रियेत कोणत्याही कमतरतेमुळे/त्रुटीमुळे उद्भवलेल्या तुमच्या तक्रारी/गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यास आम्ही सुविधा देऊ.

10. तुम्ही PhonePe ला संबंधित कंपन्या, गट कंपन्या, त्यांचे संचालक, एजंट, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार, वाद किंवा तक्रारीशी संबंधित किंवा कोणत्याही प्रकारे उद्भवलेल्या सर्व दाव्यांद्वारे, मागण्या आणि नुकसान (वास्तविक आणि परिणामी) पासून मुक्त ठेवण्यास सहमत आहात. तुम्ही सहमत आहात, की तुम्ही सोने भागीदारासह कोणत्याही व्यवहारामुळे उद्भवलेल्या वा विवादित कोणत्याही खटल्यात किंवा विवादात PhonePe ला सामील करणार नाही.

11. तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला समजले आहे, की आम्ही PhonePe प्लॅटफॉर्मवरील सोने भागीदारासह तुमच्या व्यवहारांशी संबंधित माहितीमध्ये प्रवेश करू शकतो, ही माहिती संचयित करू शकतो, प्रदर्शित करू आणि वापरू शकतो. तुम्ही हेही मान्य करता आणि कबूल करता, की आम्ही वेळोवेळी PhonePe प्लॅटफॉर्मवर अशी माहिती प्रदर्शित करू शकतो आणि/ किंवा सोने भागीदाराद्वारे अपडेटही करू शकतो. आम्ही अशा कोणत्याही माहितीच्या अचूकतेसाठी किंवा सत्यतेसाठी जबाबदार असणार नाही.

12. तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला हे समजले आहे, की SafeGold आणि / किंवाMMTC-PAMP ने निर्दिष्ट केलेल्या अटी आणि नियम (केसनिहाय) या तुमच्या सोने भागीदाराशी असलेल्या संबंधांवर शासित केल्या जातात. तुम्ही सोने भागीदारासह कोणताही व्यवहार सुरू करण्यापूर्वी लागू असलेल्या अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचण्याचे मान्य करता. तथापि, या अटी आणि सोने भागीदाराने निर्दिष्ट केलेल्या अटी व नियमांमध्ये कोणताही संघर्ष झाल्यास, या अटी दोन दस्तऐवजांमधील विवादाच्या मर्यादेपर्यंत प्रचलित असतील.

13.आम्ही वेळोवेळी आमच्या संपूर्ण आणि विवेकबुद्धीनुसार, तुम्हाला सोने भागीदारांशी करारनामा देऊन तुमच्या पेमेंट करण्यावर, उत्पादन जमा करण्यासाठी किंवा उत्पादन हस्तांतरित करण्यासाठी, ज्याच्यासाठी PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे पेमेंट करावे लागते कमाल वैयक्तिक / संचयी मर्यादेची शिफारस देऊ शकतो. यापुढे मात्र आम्ही अशा मर्यादेपेक्षा जास्त ऑर्डर नाकारण्याचा, अवरोधित करण्याचा किंवा रद्द करण्याचा हक्क राखून ठेवतो. अशा पेमेंट मर्यादा PhonePe च्या अंतर्गत जोखीम मूल्यांकन अधीन आहेत आणि आम्ही अशा मर्यादा बदलू / सुधारित करू शकतो आणि योग्य कूलिंग कालावधी लागू करू शकतो. तुम्हाला हे समजले आहे, की आम्ही वरील क्रियेसंबंधी आम्ही तुमच्याशी संवाद साधू अथवा साधणार नाही. 

14. प्रत्येक पेमेंट सूचनांसाठी अचूक माहिती प्रदान करण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल. तुम्ही सहमत आहात आणि समजून घ्या, की तुमच्या सूचनेनुसार पेमेंट प्रक्रियेला एकदा सुरुवात झाली की आम्ही पेमेंट परत करू शकणार नाही. तुमच्या पेमेंट सूचनांच्या अनुषंगाने आम्ही प्रक्रिया केलेल्या व्यवहारांमुळे तुमचे कोणतेही नुकसान झाल्यास आम्ही त्यासाठी जबाबदार असणार नाही. 

15. तुम्ही चुकीच्या रकमेच्या पेमेंटची चुकून प्रक्रिया केल्यास (उदाहरणार्थ, तुमच्याकडून टाइप करताना चूक झाल्यास), तर यासाठी तुम्ही केवळ सोने भागीदारांशी संपर्क साधू शकता. PhonePe तुम्हाला परतफेड करणार नाही किंवा तुमच्याकडून चुकून केलेले पेमेंट परत करणार नाही.

16. तुम्ही सहमती देता, की ऑनलाइन व्यवहारांमुळे उद्भवणाऱ्या सर्व जोखीमीसाठी पूर्णपणे तुम्ही जबाबदार असाल. PhonePe प्लॅटफॉर्म विलक्षण, त्रुटीमुक्त किंवा व्हायरसरहित किंवा इतर हानीकारक घटकांशिवाय असेल याची आम्ही खात्री देत नाही. PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केलेला सर्व डेटा “जसे आहे तसे”, “उपलब्ध आहे” आणि “सर्व दोषांसह” आधारावर व हमी किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रतिनिधीत्वांशिवाय व्यक्त किंवा निहित आहे. लागू कायद्यानुसार परवानगी असलेल्या पूर्ण प्रमाणात PhonePe, सर्व प्रकारच्या हमी किंवा गॅरंटी अस्वीकृत करते, वैधानिक, व्यक्त किंवा सूचित, व्यापारीकरणाच्या सूचित हमीसह परंतु त्यापुरते मर्यादित नाही, एखाद्या विशिष्ट हेतुसाठी दुरुस्ती आणि मालकी हक्कांचे उल्लंघन यांचे अस्वीकरण करते. PhonePe प्लॅटफॉर्मवरील सोने भादीदाराद्वारे प्रदान केलेल्या सर्व माहितीची अचूकता, पूर्णता आणि उपयुक्तता यांचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी तुमची आहे.

17. तुमच्या मासिक गोल्ड SIP ची रक्कम तुमच्या खात्यातून नियोजित तारखेला, जरी तुमची दिनांक आठवड्याच्या शेवटी किंवा बँकेच्या सुट्टीच्या दिवशी आली तरीही सर्वोत्तम प्रयत्नाच्या आधारावर वजा जाईल. नियोजित SIP तारखेला पेमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना कोणत्याही तांत्रिक समस्यांमुळे तुमचे पेमेंट उशीर झाल्यास, आम्ही प्रयत्न करू की तुमचे पेमेंट त्याच महिन्याच्या नंतरच्या तारखेला सर्वोत्तम प्रयत्नांच्या आधारावर डेबिट केले जाईल, समस्येचे निराकरण झाले. त्यानुसार, प्रत्यक्ष डेबिट करताना सोन्याची प्रचलित किंमत उक्त सोन्याच्या SIP खरेदी व्यवहाराच्या प्रमाणात सोन्याचे ग्राम वाटप करण्यासाठी लागू केली जाईल.

18. बँकेच्या डाउनटाइममुळे किंवा आमच्या वाजवी नियंत्रणाच्या पलीकडे असलेल्या कोणत्याही तांत्रिक समस्येमुळे आम्ही एका महिन्यासाठी नियोजित गोल्ड SIP व्यवहार प्रक्रियित करू शकलो नाही तर, PhonePe सोने खरेदीसाठी कोणत्याही संधीच्या नुकसानास जबाबदार राहणार नाही.

19. तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या गोल्ड SIP च्या देय तारखेला पुरेसा बॅलेन्स ठेवण्याचा सल्ला दिला जातो जेथे गोल्ड SIP UPI ऑटो-पे आदेश नोंदणीकृत आहे. अपुर्‍या बँक खाते बॅलेन्समुळे गोल्ड SIP देय तारखेला किंवा आसपास डेबिट सुरू करताना पेमेंट अयशस्वी झाल्यास, आम्ही तुमचे बँक खाते डेबिट करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही. PhonePe अशा पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे उद्भवलेल्या कोणत्याही थेट/परिणामी नुकसानासाठी किंवा लागू होणार्‍या बँक शुल्कासाठी त्याचे भागीदार जबाबदार राहणार नाही.

20. गोल्ड SIP खरेदीसाठी, SIP रकमेत GST आणि इतर लागू करांचा समावेश असेल आणि SIP रकमेतून लागू करांच्या समायोजनानंतर सोन्याच्या परीमाणाचे वाटप केले जाईल.

21. तुम्हाला गोल्ड SIP द्वारे गुंतवणूक चालू ठेवायची नसेल तर तुम्ही तुमची गोल्ड SIP हटवू शकता. तुमच्याद्वारे गोल्ड SIP हटवल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी PhonePe किंवा त्याचे गोल्ड पार्टनर जबाबदार राहणार नाहीत.

22. गोल्ड SIP द्वारे जमा होणारे सोन्याचे परीमाण PhonePe प्लॅटफॉर्मवर प्रत्येक भागीदारासाठी ठेवलेल्या संचित बॅलेन्समध्ये प्रतिबिंबित होईल.

23. गोल्ड SIP द्वारे जमा झालेल्या सोन्याच्या परीमाणाचे मूल्य प्रचलित बाजारभावावर आधारित असेल. PhonePe किंवा त्याचे गोल्ड पार्टनर सोन्याच्या व्यवहारांवर कोणत्याही निश्चित परताव्याची हमी देत नाहीत.

24. आम्‍हाला तुमच्या बँकेकडून अनुसूचित ऑटो-पे गोल्ड SIP डेबिटसाठी रक्कम मिळेल त्या वेळची सोन्याची प्रचलित किंमत वाटप केल्या जाणाऱ्या सोन्याच्या परीमाणासाठी लागू केली जाईल.

25. कोणत्याही अप्रत्यक्ष, परिणामी, अपघाती, विशेष किंवा दंडात्मक नुकसानासाठी PhonePe जबाबदार असणार नाही, यासह नफा किंवा उत्पन्नाच्या नुकसानासाठी मर्यादेशिवाय नुकसान, व्यवसायातील व्यत्यय, व्यवसायाच्या संधी गमावणे, डेटा गमावणे किंवा अन्य आर्थिक हितसंबंध नष्ट होणे यासह करारात, दुर्लक्ष, दिवाणी गुन्हा किंवा तत्सम घटना, प्रदान केलेली माहिती वापरण्यात किंवा असमर्थतामुळे उद्भवलेल्या कोणत्याही कारणासाठी तथापि कारणीभूत असलेल्या आणि करारातील गोष्टी, गुन्हे, निष्काळजीपणा, वॉरंटी किंवा तत्सम कारणे यासाठी PhonePe जबाबदार असणार नाही.

26. थेट उद्भवू शकणार्‍या कोणत्याही नुकसानासाठी, नुकसान, कृती, दावे आणि जबाबदाऱ्या (कायदेशीर खर्चासह) उत्पन्न होणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, या अटी आणि/किंवा सोने भागीदारांद्वारे उपलब्ध उत्पादनांची/सेवांची कोणत्याही प्रकारातील खरेदी यामधील कोणत्याही नुकसानासाठी, तुम्ही PhonePe, संबंधित कंपन्या, गट कंपन्या, त्यांचे संचालक, अधिकारी, एजंट, कर्मचारी, प्रतिनिधी यांना नुकसान भरपाईसाठी जबाबदार धरणार नाही, यासाठी तुम्ही सहमत आहात.

27. तुम्हाला कोणतीही लिखित पूर्वसूचना न देता कोणत्याही वेळी या अटींचे भाग बदलणे, सुधारित करणे, जोडणे किंवा काढून टाकणे, हा आमचा अधिकार आहे. अपडेट/बदलांसाठी अधूनमधून या अटींचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मचा अविरत वापर करत आहात, याचा अर्थ असा आहे, की तुम्ही सुधारित अटींना सहमती दिली आहे आणि स्वीकार केला आहे.

28. आम्ही संभाव्य उच्च जोखीम/फसवणुकीच्या व्यवहारासाठी तुमच्या व्यवहारांचे निरीक्षण करू शकतो. आमच्या व्यवहार देखरेखीच्या आधारावर, आम्ही व्यवहार रोखू, ब्लॉक करू किंवा व्यवहार नाकारू शकतो. आम्ही PhonePe वर तुमच्या खात्यातून काही संशयास्पद किंवा असामान्य अ‍ॅक्टिव्हिटी झाल्याचे दर्शनास आल्यास आम्ही PhonePe प्लॅटफॉर्मवरील तुमचा प्रवेश पूर्णपणे किंवा अंशतः रोखू शकतो.

29. तुम्ही सहमत आहात आणि तुम्हाला समजले आहे, की PhonePe त्याच्या अंतर्गत धोरणांनुसार, नियामक आणि वैधानिक मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे ज्या व्यवहारास संशयास्पद किंवा फसवे म्हणून वर्गीकृत केले आहे, अशा व्यवहारांची तक्रार योग्य त्या अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकते आणि अशा अनिवार्य अहवालासाठी तुमच्या झालेल्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, आमच्याद्वारे नंतरच्या काळात जर असे कोणतेही व्यवहार नियमित आणि कायदेशीर असल्याचे आढळले तरी त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही.

30. PhonePe,आपल्या विवेकबुद्धीनुसार, कोणत्याही सुचनेशिवाय कधीही PhonePe प्लॅटफॉर्मवर तात्पुरता किंवा कायमस्वरूपी, तुमचा प्रवेश निलंबित/बंद करू शकतो. याशिवाय, आम्ही संशयास्पद, अनियमित, बेकायदेशीर किंवा फसवे व्यवहार असल्याचे आमचे मत असल्यास तुमच्या कोणत्याही व्यवहाराचे मूल्यांकन आणि तपासणी करू शकतो. आम्ही तुमच्या कोणत्याही व्यवहाराचे मूल्यांकन आणि/किंवा तपासणी करू शकतो. 

31. हे स्पष्ट केलेले आहे की फसव्या युजरने फसव्या व्यवहाराद्वारे खरेदी केलेले सोने आधीच विकले असेल आणि अशा विक्रीसाठी त्यास पैसे प्राप्त झाले असतील; किंवा फसव्या युजर्सने अशा प्रकारे खरेदी केलेल्या सोन्याची डिलिव्हरी घेणे निवडले असेल, तर अशा कोणत्याही व्यवहाराला उलट करण्यास PhonePe बांधील असणार नाही. अशा घटनेत, PhonePe त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम मदत करेल, फसवणूक करणार्‍या युजर्सची कोणतीही माहिती, बँक खाते किंवा मोबाइल वॉलेट खात्यासह, ज्यामध्ये पैसे गेले आहेत, त्याबद्दल कोणतीही माहिती पीडित व्यक्ती किंवा संबंधित अधिकार्‍यांना प्रदान करेल.  

32. या नियमांना भारतीय कायदे लागू होतील, या प्रकरणी हितसंरक्षणाच्या कायद्यांचे संबंधित नियम लागू होणार नाहीत. या अटींशी संबंधित किंवा संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात उद्भवू शकणारे तुम्ही आणि PhonePe यांच्यामधील कोणतेही दावे किंवा वाद केवळ बंगळुरूमधील सक्षम कार्यक्षेत्रातील कोर्टाद्वारे ठरवले जातील.

33. युजर नोंदणी, गोपनीयता, युजरच्या जबाबदाऱ्या, नुकसान भरपाई, नियमन कायदा, उत्तरदायित्व, बौद्धिक मालमत्ता, गोपनीयता आणि सामान्य तरतुदी इत्यादी अटींसह इतर सर्व अटी PhonePe नियम व अटींच्या संदर्भात या अटींमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आहेत.