मी PhonePe वर प्रिपेड मोबाइल रिचार्ज कसे करावे?
प्रिपेड मोबाइल नंबर रिचार्ज करण्यासाठी, पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Recharge and Bill Pay/रिचार्ज आणि बिल पेमेंट विभागाअंतर्गत Mobile Recharge/मोबाइल रिचार्ज वर क्लिक करा.
- तुम्ही ज्या मोबाइल नंबरचे रिचार्ज करू इच्छिता तो मोबाइल नंबर टाका. तुम्ही तुमच्या संपर्क सूचीमधून सुद्धा संपर्क शोधू किंवा निवडू शकता.
- नाव आणि सर्कल सत्यापित करा, आणि आवश्यक असल्यास संपादित करा.
- तुम्हाला ज्या रकमेचे रिचार्ज करायचे आहे ती टाका. उपलब्ध प्लॅन पाहण्यासाठी, View Plans/प्लॅन्स पाहा वर क्लिक करा आणि एक प्लॅन निवडा.
- Recharge/रिचार्ज करा वर क्लिक करा. पेमेंट पर्याय निवडा आणि पेमेंट करा.
ॲपवर यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर, सेवा प्रदात्याद्वारे रिचार्ज केलेल्या नंबरवर एक SMS पुष्टीकरण पाठवले जाईल, आणि तुम्हाला PhonePe कडून एक ई-मेल पावती सुद्धा पाठवली जाईल.जर तुम्हाला रिचार्ज प्राप्त झाले नाही तर पुष्टीकरण स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या ऑपरेटर रेफरंस आयडी सोबत ऑपरेटरकडे संपर्क करा.
टीप: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतीय मोबाइल नंबरसाठी रिचार्ज करू शकाल.