माझा प्लॅन लागू केला का हे मला कसे तपासता येईल?

बहुतेक रिचार्ज ताबडतोब होतात आणि ऑपरेटर काही मिनिटांत रिचार्ज केलेल्या नंबरवर पुष्टीकरणाचा संदेश पाठवतात. 
तुमचा प्लॅन लागू केला गेला का हे तपासण्यासाठी, तुमच्या सेवा प्रदात्याचा बॅलेन्स चौकशी नंबरवर फोन करा. 

प्लॅनचे तपशील लागू केले गेले नसल्याची तुम्हाला खात्री असल्यास, कृपया थेट तुमच्या ऑपरेटरशी संपर्क साधा आणि याबाबत मदतीसाठी ऑपरेटर रेफरंस आयडी त्यांच्याशी शेयर करा. तुमच्या PhonePe ॲपच्या History/व्यवहार इतिहास विभागात तुम्ही ऑपरेटर रेफरंस आयडी पाहू शकता.

टीप: तुम्ही दुसऱ्या कोणा व्यक्तीचे रिचार्ज केले असेल, तर प्लॅन लागू झाला का हे तपासण्यासाठी बॅलेन्सची चौकशी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी रिचार्ज केले त्याच्या मोबाइल नंबर वरून केली जायला हवी.

अधिक माहितीसाठी पाहा - ऑपरेटर आयडी आणि त्याचा वापर कसा करायचा.