माझा रिचार्ज वारंवार अयशस्वी का होत आहे?
तुमचे रिचार्ज वारंवार अयशस्वी होत असेल, तर तुम्ही ऑपरेटरसाठी वैध रिचार्ज रक्कम निवडली असल्याचे तपासा. तसेच रिचार्ज प्रक्रियित करण्याआधी तुम्ही सर्कल आणि ऑपरेटर सुद्धा तपासल्याची खात्री करा.
काहीवेळा, ऑपरेटरकडून तांत्रिक समस्येमुळे रिचार्ज अयशस्वी होऊ शकतात. तुमची रक्कम आणि इतर तपशील बरोबर असूनसुद्धा तुमचे रिचार्ज अयशस्वी होत असेल, तर आम्ही तुम्हाला काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देतो.
टीप: जर तुमचे पैसे अयशस्वी झालेल्या रिचार्जसाठी वजा झाले असतील, तर तुम्हाला सर्व रकमेचा रिफंड प्राप्त होईल. तुम्हाला रिफंड पोहोचण्यास किती वेळ लागेल हे तुम्ही रिचार्ज करण्यासाठी वापरलेल्या पेमेंट पद्धतीवर अवलंबून असेल आणि रिफंडचे कालावधी पुढीलप्रमाणे असतील:
- UPI: 3-5 दिवस
- वॉलेट: 24 तास
- PhonePe गिफ्ट कार्ड: 24 तास
- डेबिट/क्रेडिट कार्ड: 7-9 दिवस