मला माझ्या सिलेंडरच्या बुकिंगचे पेमेंट कसे करता येईल?

PhonePe वरून तुम्ही भारत गॅस, HP गॅस आणि इंडेन गॅस कडून तुमच्या LPG गॅस सिलेंडरसाठी बुकिंग करू शकता. त्यासाठी पुढील पायऱ्यांचे अनुसरण करा:

  1. Recharge and Pay Bills/रिचार्ज व बिल पेमेंट विभागातील Book a Cylinder/सिलेंडर बुक करा वर टॅप करा.
  2. तुमचा गॅस प्रदाता निवडा. तुम्हाला पुढील गॅस प्रदात्यांसाठी सिलेंडर बुक करता येईल: 
    • भारत गॅस
    • HP गॅस
    • इंडेन
  3. संबंधित तपशील टाका.
    तुम्ही HP गॅससाठी सिलेंडर बुक करत असाल तर तुमचे राज्य, जिल्हा निवडा आणि तुमची एजंसी निवडा. तुमचा 6 अंकी उपभोक्ता क्रमांक टाका.
    भारत गॅस किंवा इंडेनच्या बुकिंगसाठी, तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा तुमचा 17 अंकी LPG आयडी टाका.. 
  4. पेमेंट करायची रक्कम तुम्हाला आपोआप दिसेल. पेमेंट माध्यम निवडा आणि पेमेंट करा वर क्लिक करा.
    टीप:अखंडित पेमेंट अनुभव सुधारण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या बिल पेमेंटसाठी PhonePe तुमच्याकडून छोटेसे शुल्क (GST सहित) आकारू शकते. तुम्ही वापरलेले पेमेंट साधन कोणतेही असले तरी प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे हे शुल्क आहे. 

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर बुकिंग आयडी प्राप्त होईल. तुम्ही या बुकिंग आयडीचा वापर तुमच्या बुकिंगचा माग घेण्यासाठी किंवा डिलिवरी संबंधित प्रश्नांना सोडवण्यासाठी एजंसीकडे संपर्क साधण्यासाठी करू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतातील गॅस प्रदात्यास पेमेंट करू शकाल.

तुमचा उपभोक्ता क्रमांक/ LPG आयडी शोधण्याबाबत अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुमचा उपभोक्ता क्रमांक/ LPG आयडी शोधणे