माझे केबल टीव्हीचे बिल पेमेंट प्रलंबित असल्यास काय करावे?
जर तुम्हाला तुमचे केबल टीव्ही बिल पेमेंट प्रलंबित दिसत असेल, तर त्याचा अर्थ आम्ही तुमच्या सेवा प्रदात्याकडून पेमेंट पुष्टीकरणाची प्रतीक्षा करत आहोत. साधारणपणे सेवा प्रदाते आम्हाला ही माहिती 48 तासांत अपडेट करतात. बिल पेमेंटची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 48 तासांनंतर PhonePe अॅपवर History/व्यवहार इतिहास तपासा.
तुमचे बिल पेमेंट यशस्वी झाल्यास, सेवा प्रदाता बिल पेमेंट यशस्वी झाल्याच्या तारखेपासून दोन दिवसांच्या आत त्यांच्या पोर्टलवर स्थिती अपडेट करेल. जर तुमचे बिलाचे पेमेंट कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाले, तर आम्ही तुम्हाला ती रक्कम परत करू.