मला माझ्या क्रेडिट कार्ड बिल पेमेंटसाठी इनव्हॉइस/पावती कशी मिळेल?
तुम्ही PhonePe वर केलेल्या तुमच्या सर्व बिल पेमेंट्ससाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल पत्त्यावर(सत्यापित असेल तर) पेमेंटची पावती प्राप्त होईल. तुम्ही तुमचा ई-मेल पत्ता सत्यापित केला नसेल, तर तुम्ही तो पुढीलप्रमाणे करू शकता:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- Verify Email/ई-मेल सत्यापित करा वर टॅप करा.
- तुम्ही आमच्याकडे रजिस्टर केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवलेला सत्यापन कोड प्रविष्ट करा, आणि पॉप-अप मधील Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
याशिवाय, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्ड बिल पेमेंटची पावती डाउनलोड करण्यासाठी पुढील पायऱ्यांचे अनुसरण करू शकता:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर History/व्यवहार इतिहासावर टॅप करा आणि संबंधित बिल पेमेंटवर क्लिक करा.
- View Receipt/पावती पहा पर्यायावर टॅप करा.
- स्क्रीनच्या तळाशी असलेल्या डाउनलोड बटणावर टॅप करा.