पेमेंटची स्थिती

PhonePe वरील UPI पेमेंट्स ही थेट बँक-ते-बँक ट्रान्सफर असतात आणि ती जलद आणि तत्काळ होतात. 

कधीकधी, तथापि, अनेक कारणांमुळे पेमेंट पूर्ण होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो किंवा ते अयशस्वी होऊ शकतात. 

पेमेंटच्या वेगवेगळ्या स्थिती ज्याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्या पुढीलप्रमाणे आहेत:

यशस्वी

तुम्हाला ही स्क्रीन दिसल्यास, याचा अर्थ तुमचे UPI पेमेंट यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. 

तुम्ही एखाद्या संपर्कास किंवा मर्चंट/बिलर/सेवा प्रदात्यास UPI पेमेंट करता याचा अर्थ होतो : 
तुमच्या बँकेला तुमची पेमेंट विनंती मिळाली.
तुमची पेमेंट रक्कम वजा झाली आहे. 
प्राप्तकर्त्या बँकेने तुमचे पेमेंट स्वीकारले आहे.
प्राप्तकर्त्याची बँक प्राप्तकर्त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करेल.  
(फक्त मर्चंट/बिलर्स/सेवा प्रदात्यांच्या पेमेंटसाठी) मर्चंट तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करेल  

टीप: मर्चंट/बिलर्स/सेवा प्रदात्यांना पेमेंटच्या मामल्यात, तुमच्या विनंतीवर प्रक्रिया संबंधित मर्चंट किंवा बिलरद्वारे त्यांच्या निर्धारित केलेल्या कालावधीनुसार केली जाईल. अधिक माहितीसाठी पाहा -  मर्चंट/बिलर्स/सेवा प्रदात्यांना पेमेंट.

हे सुद्धा पाहा:

 

 

 

प्रलंबित

तुम्हाला ही स्क्रीन दिसल्यास याचा अर्थ असा होतो की तुमचे UPI पेमेंट हे एकतर तुमच्या बँकेवर किंवा प्राप्तकर्त्याच्या बँकेवर काही तांत्रिक समस्यांमुळे अडकले आहे.  

तुम्ही एखाद्या संपर्कास किंवा मर्चंट/बिलर/सेवा प्रदात्यास UPI पेमेंट करता तेव्हा: 
तुमच्या बँकेला तुमची पेमेंट विनंती प्राप्त झाली 
तुमची पेमेंट रक्कम वजा झाली 
प्राप्तकर्ता बँकेने तुमचे पेमेंट स्वीकारले 
प्राप्तकर्त्याची बँक प्राप्तकर्त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करेल 
(फक्त मर्चंट/बिलर्स/सेवा प्रदात्यांच्या पेमेंटसाठी) मर्चंट तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करेल

तुमच्या प्रलंबित पेमेंटच्या स्थितीबाबत अपडेट करायला बँकेला 5 मिनिटे ते 2 दिवसांपर्यंतचा वेळ लागू शकतो. हे बँकेवर पूर्णपणे अवलंबून आहे.

कधीकधी, पेमेंट रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाऊ शकते. कृपया लक्षात घ्या तुमचे पैसे बँकेत नेहमी सुरक्षित असतात.

 एकदा अंतिम स्थिती अपडेट झाल्यावर, तुमच्या पेमेंटची स्थिती पुढीलपैकी एकाद्वारे चिन्हित केली जाईल:
यशस्वी - तुमची रक्कम प्राप्तकर्त्याच्या खात्यात जमा केली जाईल. (तुम्ही मर्चंट/बिलर्स/सेवा प्रदात्यास पेमेंट केले असल्यास, तुमच्या विनंतीवर प्रक्रिया केली जाईल.)
अयशस्वी - तुम्ही पुन्हा पेमेंट करू शकता. तुमची रक्कम वजा झाली असल्यास, तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात परत केले जातील. रिफंड्स बाबत अधिक माहिती पाहा. 

हे सुद्धा पाहा

अयशस्वी

तुम्हाला ही स्क्रीन दिसल्यास, याचा अर्थ तुमचे UPI पेमेंट अयशस्वी झाले असे होतो. पेमेंट अयशस्वी होण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी काही पुढीलप्रमाणे आहेत : 

चुकीचा UPI पिन

तुमच्या खात्यात अपर्याप्त बॅलेन्स असणे

  तुमच्या बँकेवर किंवा प्राप्तकर्त्याच्या बँकेवर तांत्रिक समस्या

UPI वर नेटवर्क समस्या 

बँक किंवा UPI दैनिक पेमेंट मर्यादा

  सुरक्षेच्या कारणाने

  इतर बँक संबंधित समस्या

UPI पेमेंट अयशस्वी होते, तेव्हा पेमेंट अयशस्वी होण्याच्या कारणांनुसार तुमचे पैसे कदाचित वजा होऊ शकतील किंवा होणार नाही. तुमचे पैसे वजा झाले असले तरी, कृपया खात्री करा ते तुमच्या बँकेसोबत पूर्णपणे सुरक्षित आहेत, आणि तुम्हाला तुमच्या खात्यात रिफंड केले जातील.  

रिफंड बाबत अधिक जाणा. 

हे सुद्धा पाहा -