मला लिंक केलेले PhonePe गिफ्ट कार्ड कसे वापरता येईल?
एकदा तुम्ही तुमचे PhonePe गिफ्ट कार्ड लिंक केले की, तुम्ही पेमेंट करत असताना हे कार्ड पेमेंट माध्यम म्हणून आपोआप निवडले जाईल. तसेच ते वॉलेट/गिफ्ट व्हाउचर बॅलेन्स म्हणून दर्शवले जाईल.
तुम्ही तुमच्या व्यवहारासाठी गिफ्ट कार्ड बॅलेन्सचा वापर न करण्याची निवड करू शकता, त्यासाठी तुम्ही पेमेंट स्क्रीनवरील View Details /तपशील पाहा वर क्लिक करा आणि नंतर तुमच्या पसंतीचे पेमेंट माध्यम निवडा.
महत्त्वाचे: PhonePe गिफ्ट कार्डची निवड पेमेंटचे माध्यम म्हणून केल्यास, व्यवहाराच्या कमाल आवश्यकतेपर्यंत एकूण उपलब्ध गिफ्ट कार्ड बॅलेन्सचा वापर केला जाईल. म्हणून तुम्ही उपलब्ध गिफ्ट कार्ड बॅलेन्स मधून विशिष्ट रकमेची निवड करू शकणार नाहीत.
टीप: तुम्हाला काही प्रकारच्या व्यवहारांसाठी PhonePe गिफ्ट कार्ड बॅलेन्स वापरता येणार नाही जिथे प्रिपेड पद्धतीचा वापर धोरणामुळे निषिद्ध आहे. उदाहरणार्थ, वॉलेट टॉप-अप करणे, दुसरे PhonePe गिफ्ट कार्ड खरेदी करणे आणि अशा प्रकारच्या इतर खरेदीसाठी PhonePe गिफ्ट कार्ड बॅलेन्स वापरता येत नाही.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe गिफ्ट कार्ड लिंक किंवा वटवण्यातील समस्या
.