कॅशबॅक/बक्षिसे कसे काम करतात?
विविध ऑफर्स/स्क्रॅच कार्डच्या माध्यमातून मिळालेल्या कॅशबॅक आता तुमच्या गिफ्ट कार्ड बॅलेन्समध्ये जोडल्या जातील. तुम्ही या रकमेचा वापर रिजार्च, बिल पेमेंट्स, सोन्याची किंवा चांदीची खरेदी, ऑनलाइन मर्चंट आणि दुकानात पेमेंट्ससाठी करू शकता.
काही लक्षात ठेवायचे मुद्दे:
- तुम्ही ही पेमेंट्स करताना तुमचा गिफ्ट कार्ड कॅशबॅक बॅलेन्स आणि इतर पेमेंट पद्धती यांचे संयोजन करू शकणार नाही.
- गिफ्ट कार्ड कॅशबॅक बॅलेन्स वापरताना तुम्हाला तुमचा पिन टाकण्याची गरज नसते.
महत्त्वाचे: जर एखादी ऑर्डर कॅन्सल झाली किंवा पेमेंट अयशस्वी झाले, पेमेंट करताना कमावलेली कोणतीही कॅशबॅक/बक्षिसे वजा करून रिफंड (जर असेल तर) ची रक्कम दिली जाईल. दुसऱ्या शब्दात, रिफंड रक्कम = पेमेंट रक्कम - जमा केलेली कॅशबॅक
उदा: पेमेंट रक्कम = ₹1000, कॅशबॅक = ₹100 => रिफंड रक्कम = ₹900
संबंधित प्रश्न:
मला PhonePe वर मिळालेल्या कॅशबॅकची वैधता काय आहे?