वॉलेट ऑटो टॉप-अप काय आहे?
तुमच्या PhonePe वॉलेटमध्ये पुरेसा बॅलेन्स ठेवण्यासाठी वॉलेट ऑटो टॉप-अप हा एक सोपा मार्ग आहे, ज्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा व्यापारींना तत्काळ पेमेंट करू शकता.
एकदा तुम्ही तुमच्या वॉलेटसाठी ऑटो टॉप-अप सेट केल्यावर, तुमच्या वॉलेट मधील बॅलेन्स सुरुवात रकमेपेक्षा कमी झाल्यास तुमच्या वॉलेटमध्ये आपोआप टॉप-अप केले जाईल.
उदाहरणार्थ: वॉलेट ऑटो टॉप-अपसाठी डिफॉल्ट सुरुवात रक्कम ₹200 आहे आणि तुम्ही वॉलेटची ऑटो टॉप-अप रक्कम ₹1,000 सेट केली आहे. तर जेव्हा तुमचा बॅलेन्स ₹200 पेक्षा कमी होईल, तुमचे वॉलेट आपोआप ₹1,000 रकमेने टॉप-अप केले जाईल.
PhonePe वर वॉलेट ऑटो टॉप-अप सेट करण्याबाबत अधिक जाणून घ्या.