- तुमच्या वॉलेटमध्ये कोणताही काढता येणारा बॅलेन्स नसेल तर वॉलेट बंद केले जाऊ शकत नाही.
- जर तुमचे कोणतेही प्रलंबित रिफंड/मर्चंट व्यवहार असतील तर वॉलेट बंद केले जाऊ शकत नाही.
- तुम्ही PhonePe वर बँक खाते लिंक केले नसेल तर तुम्ही वॉलेट बंद करू शकत नाही.
मी माझे PhonePe वॉलेट कसे बंद करू शकेन?
महत्त्वाचे: तुम्ही तुमचे PhonePe वॉलेट एकदा बंद केल्यावर त्यास पुन्हा सक्रिय करू शकणार नाही.
तुमचे PhonePe वॉलेट बंद करण्यासाठी,
- स्क्रीनवरील खाली दिलेल्या Close Wallet/वॉलेट बंद करा बटनावर क्लिक करा.
- वॉलेट बंद करण्यासाठी कारण निवडा.
- Confirm and Deactivate Wallet/पुष्टी करा आणि वॉलेट निष्क्रिय करा वर टॅप करा.
- DEACTIVATE WALLET/वॉलेट निष्क्रिय करा वर टॅप करा.
माझ्या वॉलेट बॅलेन्स सोबत काय होईल?
तुम्ही तुमचे PhonePe वॉलेट बंद केल्यावर, तुमचा वॉलेट बॅलेन्स रक्कम तुम्ही ज्या पेमेंट स्त्रोताचा वापर करून टॉप-अप केले होते त्या मूळ स्त्रोतावर ट्रान्सफर केली जाईल. तथापि मूळ स्त्रोतावर पैसे परत करणे अयशस्वी झाले तर रक्कम तुमच्या PhonePe वरील लिंक प्राथमिक बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.
तुमचे वॉलेट बंद करणे यशस्वी झाल्यास, तुम्हाला पैसे प्राप्त होण्यासाठी UPI साठी 3 ते 5 दिवस आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी 7 ते 9 दिवस लागू शकतात.
टीप: तुम्ही तुमच्या PhonePe खात्यासोबत बँक खाते लिंक केले नसेल, तर तुम्ही बंद करण्याची विनंती सादर करण्यापूर्वी लाभार्थी बँक खाते जोडू शकता. रक्कम नंतर तुमच्या लाभार्थी बँक खात्यात क्रेडिट केली जाईल.