मला माझे निष्क्रिय झालेले PhonePe वॉलेट सक्रिय कसे करता येईल?
तुमचे PhonePe वॉलेट निष्क्रिय केलेले असेल, तर ते पुढीलपैकी एका स्थितीत असू शकते:
- बंद
- निष्क्रिय
बंद वॉलेट: तुम्ही वॉलेट बंद करण्यासाठी विनंती केली असल्यास तुमचे वॉलेट बंद स्थितीत राहील. एकदा वॉलेट बंद केल्यावर तुम्ही त्यास पुन्हा-सक्रिय करू शकणार नाही.
निष्क्रिय वॉलेट: RBI च्या नियमांनुसार, तुमचे PhonePe वॉलेट निष्क्रिय केले जाते, जर तुम्ही तुमच्या वॉलेटचा वापर गेल्या 12 महिन्यांमध्ये खालीलपैकी कोणत्याही गोष्टीसाठी केलेला नाही:
- तुमच्या वॉलेटमध्ये पैसे टाकणे (टॉप-अप) करणे
- काढता येणाऱ्या वॉलेट बॅलन्सचा वापर करून मर्चंट व्यवहारांसाठी पेमेंट करणे
- काढता येणारा वॉलेट बॅलेन्स काढणे
- तुमचे किमान-KYC पूर्ण करणे
Topup Wallet/वॉलेट टॉप-अप करा स्क्रीन वर OTP सत्यापन पूर्ण करण्याद्वारे तुम्ही निष्क्रिय असलेले PhonePe वॉलेट पुन्हा सक्रिय करू शकता.
तुमचे निष्क्रिय वॉलेट पुन्हा सक्रिय करण्यासाठी,
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा. तुमचा वॉलेट बॅलेन्स तपासण्यासाठी Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत PhonePe वॉलेट वर टॅप करा.
- Activate Wallet/वॉलेट सक्रिय करा वर क्लिक करा.
- PhonePe वर नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाका.
- सत्यापन पूर्ण करण्यासाठी OK/ठीक आहे वर करा आणि तुमचे PhonePe वॉलेट पुन्हा सक्रिय करा.