मी माझ्या PhonePe वॉलेट मध्ये पैसे कसे टाकू?
महत्त्वाचे: जर तुम्ही KYC युजर असाल (किमान KYC/आधार eKYC/पूर्ण KYC), तरच तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. KYC नसलेले युजर वॉलेट बॅलेन्स टॉप अप करू शकत नाहीत किंवा त्यातून पैसे काढूही शकत नाहीत.
तुमच्या PhonePe वॉलेट मध्ये पैसे टाकण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा. Payment Methods/पेमेंट पद्धती सेक्शनमधील PhonePe वॉलेट वर टॅप करा.
- तुम्ही तुमच्या वॉलेट मध्ये टाकू इच्छित असलेली रक्कम टाका.
- पेमेंटचे माध्यम म्हणून UPI/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डची निवड करा.
टीप: तुम्ही वॉलेट टॉप-अपसाठी प्रिपेड कार्ड वापरू शकत नाही. - वॉलेट टॉप-अप करा वर क्लिक करा.
संबंधित प्रश्न:
मी माझा PhonePe वॉलेट बॅलेन्स कसा तपासावा?
PhonePe वॉलेट वापरण्यासाठी माझे वय किती असायला हवे?
मला वॉलेट टॉप अप विनंतीमध्ये काही समस्या येत असल्यास काय करावे?